Sanjay Shirsat | सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला असून या अपघातात त्यांचं निधन झालं. या घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या शपथविधीवर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, “शपथविधी इतक्या लवकर कोणी करायला लावला? असे प्रश्न लोक विचारत आहेत.” तर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दु:खद घटनेनंतर इतक्या लवकर शपथविधी होणं लोकांना आवडलेलं नाही.”
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, त्यांनी केवळ जनतेची भावना मांडली आहे. कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्याला काही देणंघेणं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उदय सामंत म्हणाले की, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, याबाबत कोणालाही वाईट वाटलेलं नाही. मात्र हे इतक्या लवकर का झालं, असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. तसेच सुनेत्रा पवार अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिरसाट यांनी पुन्हा स्पष्ट केलं की, दु:खद घटनेनंतर लगेच शपथविधी होणं सर्वसामान्य लोकांना पटलेलं नाही.
Published on: Feb 06, 2026 04:47 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी