Narendra Modi | नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
‘परीक्षा पे चर्चा 2026’ हा दरवर्षी आयोजित केला जाणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांना परीक्षेच्या तयारीबाबत सूत्रे आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन करतात. या चर्चेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे प्रश्न घेतले जातात आणि परीक्षेच्या तणावाशी कसे सामना करायचा, वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर उपाय सुचवले जातात. मोदींनी यावेळी टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असल्यावर भर दिला.
‘परीक्षा पे चर्चा 2026’ हा दरवर्षी आयोजित केला जाणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांना परीक्षेच्या तयारीबाबत सूत्रे आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन करतात. या चर्चेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे प्रश्न घेतले जातात आणि परीक्षेच्या तणावाशी कसे सामना करायचा, वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर उपाय सुचवले जातात. मोदींनी यावेळी टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असल्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, दिवसात सर्वांना समान 24 तासच मिळतात आणि त्या वेळेचा चांगला उपयोग करणं अपेक्षित आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दिवसाचे काम आधीपासून यादी करून ठेवलं पाहिजे आणि कमी आवडणाऱ्या विषयांसाठी अधिक वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी होतो. याशिवाय मोदींनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास ठेवा, स्वप्न मोठी ठेवावी आणि तणाव कमी करण्याचे नियम याविषयी सुद्धा सल्ले दिले. AI चा उपयोग कधी आणि कसा करावा, हे सुध्दा त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Feb 06, 2026 01:23 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...

