AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 : Ambani – Adani झाले आणखी श्रीमंत,या 5 उद्योजकांचे बुडाले अब्जावधी रुपये

साल २०२५ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांच्यासाठी चांगले गेले आहे. श्रीमंतीच्या यादीत त्यांचे पहिले स्थान राहिले आहे. तर उद्योजक गौतम अदानी यांनी जोरदार पुनरागन करीत भारताचे दुसरे श्रीमंत म्हणून त्यांची नोंदणी झाली आहे. आयटी आणि रिअल इस्टेटच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने शिव नाडर आणि अझीम प्रेमजी संपत्ती कमी झाली आहे.

2025 : Ambani - Adani झाले आणखी श्रीमंत,या 5 उद्योजकांचे बुडाले अब्जावधी रुपये
Ambani - Adani
| Updated on: Dec 30, 2025 | 4:17 PM
Share

साल २०२५ भारतीय अब्जाधीशासाठी कडू-गोड अनुभवाचा राहीला. एकीकडे काही उद्योगपतींच्या तिजोरी काटोकाट भरल्या तर बाजारातील चढ-उताराने अनेक दिग्गज उद्योगपतींचा संपत्तीला फटका बसला आहे. यावर्षी कमाईच्या शर्यतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सर्वात पुढे राहिले आहेत. तर गौतम अदानी यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास कमावत पुन्हा वापसी केली आहे. मात्र, आयटी आणि रिएल सेक्टरच्या दिग्गजांसाठी हे वर्षे थोडे भारी पडले आहे. चला तर सविस्तर पाहूयात. अखेर साल २०२५ मध्ये भारताच्या अब्जाधीशांच्या यादीत कोणते मोठे बदल झाले

अंबानी यांनी ‘सुपर’ कमाई

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या ताज्या आकड्यांनुसार मुकेश अंबानी यांच्यासाठी साल २०२५ हे सुवर्ण स्वप्नासारखे राहिले. त्यांच्या एकूण संपत्तीत या एकाच वर्षात १६.५० अब्ज डॉलर्सची मोठी भरपाई झाली आहे. या जबरदस्ती वाढीमागे त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शानदार प्रदर्शन राहिले आहे.

बाजारात रिलायन्सच्या शेअरने २०२० नंतर आपले चांगले प्रदर्शन करीत जवळपास ३० टक्के झेप घेतली आहे. यामागे ठोस कारण रिफाईनिंग मार्जिनचे वाढणे राहिले आहे.

टेलिकॉम टॅरिफमध्ये झालेली वाढ आणि रिटेल बिझनसचे मजबूत प्रदर्शन. याशिवाय कंपनीच्या व्हॅल्यू अनलॉकिंगच्या बातम्यांनी देखील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला आहे. ज्याचा थेट फायदा मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये पाहायला मिळाला आहे.

अदानी यांचे कमबॅक, मित्तल यांचा डबल धमाका

स्टील किंग आणि आर्सेलर-मित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी देखील या वर्षी कमाईत नवा इतिहास रचला आहे. जगातले दुसरे मोठे स्टील निर्माता मित्तल यांनी संपत्तीत सुमारे १२ अब्ज डॉलर जोडले गेले आहेत. ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ३१ अब्ज डॉलरच्या पार गेली आहे. तसेच एअरटेलचे मालक सुनील मित्तल यांनी देखील मागे वळून पाहिले नाही. एअरटेलच्या शेअरमध्ये ३१ टक्के वाढ आणि नफ्यात ८९ टक्के उसळी आल्याने त्यांची संपत्ती ६ अब्ज डॉलरने वाढून २९ अब्ज डॉलर झाली आहे.

गौमत अदानी यांच्यासाठी हे वर्षे प्रतिष्ठा वाचवणे आणि पुनरागमनाचे राहिले. हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने (Sebi) क्लिन चिट दिल्याने त्यांना संजीवनी मिळाली. यामुळे गुंतवणूकदांचा विश्वास पुन्हा परतला आणि अदानी ग्रुपचे शेअर्समध्ये आलेल्या उसळीने त्यांच्या संपत्तीत ५.९ अब्ज डॉलर जोडले गेले आहेत. आता ८४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह मुकेश अंबानी यांच्या नंतर भारताचे ते दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. याशिवाय आदित्य बिरला ग्रुपचे कुमार मंगलम बिरला आणि कोटक महिंद्र बँकेचे उदय कोटक यांनीही त्यांच्या संपत्तीत अब्ज डॉलर जोडले गेले आहेत.

टेक आणि रियाल्टी दिग्गजांना मोठा झटका

एकीकडे संपत्तीत वाढ होत असताना काही सेक्टरमध्ये मंदीचे ढग जमा झाले होते. एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर यांना या वर्षी सर्वाधिक नुकसान झेलावे लागले आहे. परदेशी गुंतवणूकदारांव्दारे आयटीच्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे एचसीएलचे शेअर १५ टक्क्यांपर्यंत कोसळले. ज्यामुळे नाडर यांच्या संपत्तीत सुमारे ४ अब्ज डॉलरची घसरण झाली.

विप्रोचे माजी चेअरमन आणि दिग्गज आयटी व्यावसायिक अझीम प्रेमजी यांच्या बाबतीत अलिकडे असे झाले आहे. विप्रोच्या शेअर्समध्ये १२ टक्के घसरण झाल्याने त्यांची नेटवर्थ ३ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. रिअर इस्टेट सेक्टरमध्ये डीएलएफचे (DLF) के.पी. सिंह यांच्या संपत्तीत ३.३८ अब्ज डॉलरची कमतरता नोंदली गेली आहे. कारण त्यांच्या कंपनीच्या शेअर १७ टक्क्यांपर्यंत कोसळले. सन फार्माचे दिलीप संघवी आणि वरुण बेव्हरेजेसचे रवि जयपुरिया यांच्या संपत्तीतही घसरण नोंदली गेली आहे.

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.