Bajrang Sonawane | अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली शंका
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत असून हा अपघात होता की घातपात? यावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते तसेच इतर पक्षांतील सहकारी अजूनही या घटनेतून सावरू शकलेले नाहीत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत असून हा अपघात होता की घातपात? यावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं, या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
सोनवणे यांनी सांगितले की, अपघाताच्या दिवशी सकाळपासून अजित पवार यांची संपूर्ण दिनचर्या समोर आली पाहिजे. तसेच विमानात बॉम्ब होता का? किंवा इंजिनमध्ये स्फोट झाला का? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी पाहिलेल्या काही फुटेजच्या आधारे, विमान जमिनीला लागण्यापूर्वीच स्फोट झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Published on: Feb 06, 2026 05:47 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

