Sanjay Raut | सत्ता हातात आली की अकलेची शिंगं फुटतात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. शरद पवार हे देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणातील प्रमुख स्तंभ असल्याचं सांगत, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राजकारणात इतका प्रभाव असलेला नेता दुसरा कोणी नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. शरद पवार हे देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणातील प्रमुख स्तंभ असल्याचं सांगत, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राजकारणात इतका प्रभाव असलेला नेता दुसरा कोणी नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यासमोर आजचे नेते हे ज्युनिअर आहेत. त्यांच्या अनुभवाची, राजकीय जाणिवेची आणि निर्णयक्षमतेची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. अशा ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना सल्ले देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. “सत्तेवर बसल्यानंतर काही लोकांना अकलेची शिंगं फुटतात. मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले की आपण सर्वज्ञ आहोत, अशा थाटात काही जण वागतात आणि थेट पवार साहेबांना सल्ले देऊ लागतात,” असा घणाघाती टोला संजय राऊत यांनी लगावला. या वक्तव्यातून त्यांनी भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. हातात सत्ता असल्यामुळे काहींना अहंकार येतो आणि त्यातूनच अशी वक्तव्ये केली जातात, असा आरोप करत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांसारख्या नेत्यांना सल्ले देण्याऐवजी त्यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.
Published on: Feb 06, 2026 11:51 AM
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..

