AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या प्रकरणात अडचणी वाढल्या, एकनाथ खडसे यांना दणका, थेट अजामीनपात्र वॉरंट

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात हजर न झाल्याने कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

त्या प्रकरणात अडचणी वाढल्या, एकनाथ खडसे यांना दणका, थेट अजामीनपात्र वॉरंट
Eknath Khadse
| Updated on: Feb 07, 2026 | 12:17 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या दाम्पत्याच्या विरोधात भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आज या प्रकरणात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

पुणे येथील भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले होते. शुक्रवारी या प्रकरणात सुनावणीला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे. या प्रकरणात शुक्रवारी आरोपनिश्चिती होणार होती. मात्र, एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता

विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज डिसेंबर महिन्यात फेटाळला होता. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल झाले आहे. या सुमारे एक हजार पानांच्या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला होता.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश