AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 या वर्षाने मला आयुष्याचे मोठे धडे दिले..; सरत्या वर्षाबद्दल काय म्हणाली केतकी कुलकर्णी?

2025 हे शिकवणीचं वर्ष कसं होतं आणि 2026 या नवीन वर्षाबद्दल काय अपेक्षा आहेत, याविषयी 'कमळी' फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णी मोकळेपणे व्यक्त झाली. 2025 या वर्षाने मला सर्वांत मोठे धडे दिले, असं ती यावेळी म्हणाली.

2025 या वर्षाने मला आयुष्याचे मोठे धडे दिले..; सरत्या वर्षाबद्दल काय म्हणाली केतकी कुलकर्णी?
ketaki kulkarniImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2025 | 9:26 PM
Share

झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ या मालिकेतील अनिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली केतकी कुलकर्णी हिने 2025 हे वर्ष तिच्यासाठी कसं होतं, याबद्दल सांगितलं आहे. केतकी म्हणते की 2025 हे वर्ष तिच्यासाठी खूपच मिश्र अनुभवांचं होतं. “जानेवारी ते जुलै या काळात मी एक वेगळी व्यक्ती होते आणि जुलै ते डिसेंबरमध्ये मी पूर्णपणे बदलले. सध्या मी जी आहे ती व्यक्ती मला जास्त आवडते. 2025 मी अनेक शिकवणींसह संपवत आहे. अशा शिकवण्या ज्या मी आयुष्यभर सोबत ठेवणार आहे,” असं ती म्हणाली.

याविषयी ती पुढे सांगते, “काही गोष्टींसाठी ती खूप कृतज्ञ आहे, तर काही कठीण धडे आयुष्य कसं जगायचं, प्रत्येक क्षण कसा एंजॉय करायचा, हे शिकवणारे होते. 2025 या वर्षाने मला शिकवलं की काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात आणि फार जास्त अटॅचमेंट ठेवू नये. देवावर विश्वास ठेवावा आणि सगळं काही एका कारणासाठीच घडतं, हे मान्य करावं. माझ्यासाठी 2025 मधला सगळ्यात मोठा धडा हाच आहे.”

ती म्हणते, “कुठल्याही गोष्टीसाठी जास्त काळ दुःखी राहण्यापेक्षा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. हा धडा मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 2025 मधली माझी सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे कमळी या मालिकेसाठी झी मराठीसोबत काम करणं आणि अनिका ही भूमिका साकारणं.” या वर्षात काही इच्छा पूर्ण न झाल्याचंही ती प्रामाणिकपणे मान्य करते. “मला इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स हवेत, ही थोडीशी वेगळी इच्छा होती, पण ती अजून पूर्ण झाली नाही. तसंच मला खूप प्रवास करायचा होता, परदेशातही जायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. आता आशा आहे की 2026 मध्ये या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे शिकवल्याबद्दल 2025 ला धन्यवाद.”

“मला मी कोण आहे हे ओळखायला शिकवलंस. नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन गोष्टी मिळवण्याची संधी दिलीस. स्वीकारायला, पुढे जायला, संधी ओळखायला आणि प्रत्येक क्षण जगायला शिकवलंस म्हणून थँक यू. नववर्षाचं सेलिब्रेशन मी आपल्या जवळच्या लोकांसोबत करणार असून, मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे डान्स करत सेलिब्रेट करून वर्षाचा शेवट करणार आहे,” असं तिने पुढे सांगितलं.

“2025 हे शिकवणीचं वर्ष होतं आणि 2026 मध्ये त्या शिकवण्या वापरण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रवास करायचा आहे, आरोग्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. किमान बेसिक वर्कआऊट तरी नियमित करणं, सोशल मीडिया अकाउंटवर काम करून जे मागच्या वर्षी राहून गेलं ध्येय साध्य करायचं आहे. तसंच माझ्या चाहत्यांशी जास्त कनेक्ट होऊन त्यांना काय पाहायला आवडेल माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर तेही जाणून घ्यायचं आहे,असे केतकीने सांगितले. तुम्हाला येणारं नवीन वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो,” अशा शुभेच्छा तिने चाहत्यांना दिल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...