Mahayuti | मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ ; शरद पवार गटाचा एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेत आता रावराणे यांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे बळ अधिक मजबूत झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेत आता रावराणे यांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे बळ अधिक मजबूत झाले आहे. मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ पासून निवडून आलेले रावराणे यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी महायुती गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पालिकेतील शरद पवार गटाचा एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांच्या गटात मिसळणार आहे. अजित रावराणे म्हणाले की, प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यात अडचणी होत्या. तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुतीकडून सहकार्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले. त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील राजकीय संतुलन बदलण्याची शक्यता वाढली आहे.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

