AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनू सूदची 5% मदत, 95% पीआर; लातूरच्या शेतकऱ्याचा विषय, ट्रोलरला अभिनेत्याचं कडक उत्तर

लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन सोनू सूदने दिलं होतं. त्यावरून आता एका युजरने त्याला ट्रोल केलं असून संबंधित ट्रोलरला सोनू सूदने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोनू सूदची 5% मदत, 95% पीआर; लातूरच्या शेतकऱ्याचा विषय, ट्रोलरला अभिनेत्याचं कडक उत्तर
लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून गेला सोनू सूदImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2025 | 11:40 AM
Share

शेत नांगरणीसाठी बैल नसल्याने लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्यांना बैलांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं ट्विट त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केलं होतं. त्यानंतर एका युजरने त्याच्या मदतीबाबत प्रश्न उपस्थित केला. सोनू सूदची टीम 5 टक्के मदत आणि 95 टक्के पीआर (प्रसिद्धी) करते, असा आरोप संबंधित युजरने केला. या युजरला आता खुद्द सोनू सूदने सडेतोड उत्तर दिलं आहे. लातूरच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत केल्याची पावती शेअर करत त्याने ट्रोलरचं तोंड बंद केलं आहे.

वृद्ध शेतकऱ्याचा फोटो शेअर करत ट्रोलरने लिहिलं होतं, ‘या शेतकऱ्याचा फोटो तुम्हाला आठवतोय का? अभिनेता सोनू सूदने लिहिलं होतं, तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो. ही गोष्ट नेहमीच माझ्या लक्षात आली की, सोनू भावाची टीम मदत 5% आणि पीआर 95% करते. ज्यांना मदत करायची होती, त्यांनी केली. राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 42,500 रुपयांचं कर्ज स्वत: फेडलंय. तर दुसरीकडे सोनू भावाच्या टीमने फक्त एक्सवर वाहवा मिळवली. जी व्यक्ती आजसुद्धा हाताने शेती करत असेल, त्यांच्याकडे ट्विटर कुठून येईल, हे कोणी मला सांगू शकेल का? असो, सोनू भावाने कोणती मदत केली असेल तर सांगा, तीसुद्धा मी लिहितो.’

या ट्विटवर सोनू सूदने स्वत: उत्तर दिलं आहे. आर्थिक मदत केल्याची पावती शेअर करत त्याने सुनावलं, ‘माझ्या वाट्याची मदत तर मी आधीच आपले शेतकरी अंबादास भाऊ यांची केली होती. आता तुमच्या वाट्याचा चारासुद्धा तुम्ही पाठवून द्या. काय आहे ना भाऊ, ट्विटरवर विष पसरवून देश चालणार नाही. इतर कोणाला मदत पाठवायची असेल तर मेसेज कर.’ लातूर जिल्ह्यातल्या हाडोळती इथल्या शेतकऱ्याला सोनू सुदने 45 हजार रुपयांची मदत पाठवली आहे. शेतकरी अंबादास पवार यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं ट्विट सोनू सुदने केलं आहे. सोनू सूद या शेतकऱ्याला बैलजोडी घेऊन देणार होता. मात्र अगोदरच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बैलजोडी भेट दिल्याने त्याने 45 हजार रुपये पाठवले आहेत.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.