AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली, लातूरचे मनपा आयुक्त मनोहरे प्रकरणात मोठं ट्विस्ट

लातूरचे महापालिका आयुक्त बाबासासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट समोर आलं आहे.

'तो' फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली, लातूरचे मनपा आयुक्त मनोहरे प्रकरणात मोठं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2025 | 3:05 PM
Share

लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरचे महापालिका आयुक्त बाबासासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडली. मात्र त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

बाबासाहेब मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार मनोहरे यांना कोणाचा तरी फोन आला होता, फोनवर बोलल्याननंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली, आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान आता पोलिसांनी त्यांचा फोन जप्त केला आहे. मनोहरे हे आयफोन वापरत होते. मनोहरेंना कोणाचा फोन आला? समोरचा व्यक्ती फोनवर बोलला का? नेमकं काय संभाषण झालं याबाबत आता तपास केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान बाबासाहेब मनोहरे यांची प्रकतीमध्ये काल थोडी सुधारणा दिसत होती, अशी माहिती देखील त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मनोहरे यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई विमानतळावर आणण्यात आलं आहे, त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. विमानतळापासून ते कोकिलाबेन रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, या घटनेनं खळबळ उडाली. लातूरचे महापालिका आयुक्त बाबासासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूरमध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांना आता उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये,  त्यांच्यावर  आता मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी त्यांचा फोन ताब्यात घेतला आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात