AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! फेअरनेस क्रीममुळे झाला किडनीचा आजार! गायकाचा दावा; नेमकं प्रकरण जाणून घ्या

गायक आणि संगीतकारने रविवारी सांगितले की, सुमारे १० वर्षांपूर्वी एका मित्राच्या सल्ल्यावरून 'फेअरनेस क्रीम' वापरल्यानंतर त्याला मूत्रमार्गाचा गंभीर संसर्ग झाला होता.

धक्कादायक! फेअरनेस क्रीममुळे झाला किडनीचा आजार! गायकाचा दावा; नेमकं प्रकरण जाणून घ्या
Singer Saleem Kodathoor
| Updated on: Nov 23, 2026 | 10:04 AM
Share

गायक आणि संगीतकार सलीम कोडाथूरने एक मोठा खुलासा केला. त्याने रविवारी सांगितले की, सुमारे १० वर्षांपूर्वी एका मित्राच्या सल्ल्यावरून ‘फेअरनेस क्रीम’ वापरल्यानंतर त्याला मूत्रमार्गाचा गंभीर संसर्ग झाला होता. काही महिन्यांच्या आतच त्याच्या पापण्यांवर आणि पायांवर सूज आली, तसेच त्याची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, सलीमने पत्रकारांना सांगितले की, डॉक्टरांच्या मते, त्याच्या शरीरातील अल्ब्युमिन म्हणजेच एक महत्त्वाचे प्रथिनाची पातळी कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की, जर या प्रथिनांची पातळी आणखी कमी होत गेली, तर त्यामुळे किडनी निकामी होऊ शकतात.

किडनी झाली खराब, झोपही येईना!

त्याने सांगितले की, किडनीच्या बायोप्सीमध्ये त्याला ‘मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी’ हा आजार असल्याचे निदान झाले. या आजारावरील उपचारांसाठी त्याला अनेक महिने रुग्णालयात राहावे लागले. सलीमने सांगितले की, त्याने ५०० रुपयांना एक क्रीम विकत घेतली होती आणि ती वर्षभरापेक्षा जास्त काळ वापरली. पण त्यामुळे त्याला अजूनही आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः त्याला झोपेशी संबंधित समस्या निर्माण झाली. तो म्हणाला, “मी दिवसातून फक्त दोन ते तीन तास झोपू शकतो. काही दिवस तर मला झोप येण्यासाठी औषधेही घ्यावी लागतात.”

१७ वर्षीय मुलीच्या बाबतीतही घडली सेम स्थिती

अशीच स्थिती एका १७ वर्षीय मुलीच्या बाबतीतही दिसून आली. तिनेही अशीच क्रीम वापरली होती. मलप्पुरममधील ‘ॲस्टर एमआयएमएस मदर हॉस्पिटल’च्या डॉक्टरांच्या मते, इन्स्टाग्रामवरील ‘इन्फ्लुएन्सर्स’चे जाहिरातपर व्हिडीओ पाहून या मुलीने ती क्रीम विकत घेतली होती. या व्हिडिओंमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ही क्रीम वापरल्याने मुरुमे, काळे डाग आणि त्वचेवरील पिगमेंटेशन समस्या दूर होऊ शकतात.

त्या मुलीने सांगितले की, ती क्रीम वापरल्यावर तिला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागल्या. तिचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि ती बेशुद्ध पडली. याव्यतिरिक्त, तिच्या पायांवर इतकी सूज आली की चालणे आणि पायऱ्या चढणे कठीण झाले, ज्यामुळे तिला रुग्णालयात जावे लागले. सलीमने सांगितले की त्यालाही अशीच लक्षणे जाणवली, ज्यामुळे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला. परिणामी, त्याला आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले, ज्यातून त्याचे आर्थिक नुकसानही झाले.

Follow Us
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा