मला खुर्चीची अभिलाषा नाही, पण एकदा हातात सत्ता देऊन बघा…; लातूरच्या भाषणातून राज ठाकरेंची महाराष्ट्राला पुन्हा साद

Raj Thackeray Latur Sabha Full Speech : लातूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. एकदा हातात सत्ता देऊन बघा, अशी साद राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला घातली आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मला खुर्चीची अभिलाषा नाही, पण एकदा हातात सत्ता देऊन बघा...; लातूरच्या भाषणातून राज ठाकरेंची महाराष्ट्राला पुन्हा साद
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 1:51 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भाषणांमधून ‘एकदा हातात सत्ता द्या’ अशी साद वारंवार महाराष्ट्राला घालत असतात. आताही राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे लातूरमध्ये आहेत. लातूरच्या रेणापूरमध्ये राज ठाकरेंची सभा होत आहे. या सभेतून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला ही साद घातली आहे. महाराष्ट्राला माझं सांगण आहे की, या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा. मी विनाकारण बोलत नाही. मी सत्ता न पाहिलेला माणूस नाहीये. मी सत्ता पाहिली आहे. मला कोणत्याही खुर्चीची अभिलाषा नाहीये. मी तुम्हाला सांगतो राज्यातील एकही तरुण आणि तरुणी हाताला कामाविना राहणार नाही. मी खरंच सांगतो हे खरंच सत्य आहे. माझ्या पक्षाचा जाहीरनामा येत आहे. त्यातही मी याचा उल्लेख केला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसेच्या जाहीरनाम्यात काय?

बाकीच्यांचं काय येत माहीत नाही. माझ्या जाहीरनाम्यात तेवढ्याच गोष्टी टाकणार आहे. टाकलेल्या आहेत जेवढ्या मला शक्य तेवढ्याच टाकल्या आहेत. त्यातील एक गोष्ट सांगतो. प्रत्येक मराठी मुलींना आणि मुलांना १०० टक्के रोजगार या महाराष्ट्रातच मिळेल. खासगी कंपन्यात आरक्षण नाही. ते आरक्षण देत नाही. मी आता शब्द देतो. या खासगी कंपन्यातही आरक्षणाविना राज्यातील मराठी मुला मुलींना नोकऱ्या मिळतील. उद्योगधंदा करायचा असेल तर राज्यातील मुलं मुली घ्यावी लागतील. त्यांच्या हाताला काम मिळाल्यावर नोकऱ्या मिळाल्या तर बाहेरची बोलावू. माझ्या राज्यातील मुलं उपाशी राहत असतील तर मला ते चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

आपण महाराष्ट्रातील आहोत. मराठी आहोत. हिंदू आहोत. पण आपण एकमेकांकडे जातीने पाहत आहोत. हिणवत आहोत. एकमेकांच्या दुकानात जात नाही असं चित्र मराठवाड्यात कधी नव्हतं. राज्यातील कोणत्याही तरुणाला नोकरी आणि शिक्षण मिळालंच पाहिजे. हाताला काम मिळालं पाहिजे. या जातीचा आहे म्हणून मिळावं आणि त्या जातीचा म्हणून मिळू नये ही कोणती बुद्धी?, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील धार्मिक तेढावावर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात निवडणूक लढवू. नंतर म्हणतात नाही लढणार. पाडणार. तुम्हाला लढायचं तर लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो. मी जरांगे पाटलांना भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर मांडली. हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल, असं म्हणत राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.