शिवसेना भवनमध्ये शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. थोड्याच वेळात बैठक सुरु होणार असल्याची माहिती आहे. बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. राज्यातल्या सगळ्या जिल्हा संपर्कप्रमुखांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
दोन दिवसांआधी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जातंय, त्यांना माजी किंवा भावी मुख्यमंत्री म्हणेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
सध्या राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी