AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026, PAK vs NAM : पाकिस्तानने नामिबियाला 102 धावांनी केलं पराभूत, सुपर 8 फेरीत एन्ट्री

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 35व्या सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. नामिबियाचा 102 धावांनी पराभव करून सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे.

T20 WC 2026, PAK vs NAM : पाकिस्तानने नामिबियाला 102 धावांनी केलं पराभूत, सुपर 8 फेरीत एन्ट्री
T20 WC 2026, PAK vs NAM : पाकिस्तानने नामिबियाला 102 धावांनी केलं पराभूत, सुपर 8 फेरीत एन्ट्रीImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 18, 2026 | 6:15 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीचं गणित नामिबियाविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून होतं. या सामन्यात विजय मिळाला तर सुपर 8 फेरीत जागा मिळणार होती. अखेर पाकिस्तानने नामिबियाला पराभूत केलं आणि सुपर 8 फेरीत जागा पक्की केली. यामुळे अमेरिकेच्या उरल्यासुरल्या ज्या काही आशा होत्या. त्या संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यात पाकिस्तानने प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले होते. शाहीन शाह आफ्रिदीला प्लेइंग 11 मधून वगळलं. तसेच फलंदाजीत बाबर आझमला मैदानात उतरवलंच नाही. पाकिस्तानने या दोघांना काहीही वगळण्याचा निर्णय घेतल्याचं यातून दिसून आलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात पाकिस्तानने 20 षटकात 3 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात साहिबजादा फरहानची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. हा सामना पाकिस्तानने 102 धावांच्या फरकाने जिंकला.

पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि सईम आयुब ही जोडी मैदानात आली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. पावरप्लेचं शेवटचं षटकं सुरू असताना पहिल्या चेंडूवर सईम आयुबची विकेट मिळाली. त्यानंतर साहिबजादा फरहानने कर्णधार सलमान आगासोबत मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 67 धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर ख्वाजा नाफाय मैदानात उतरला. पण तो काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून तंबूत परतला. त्याला बाबर आझमच्या पुढे प्रमोशन देण्यात आलं होतं. पण बाद झाल्यानंतरही बाबर ऐवजी शादाब खानला पुढे पाठवल. शाहिबजादा फरहान आणि शादाब खान यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 81 धावांची खेळी केली.

पाकिस्ताननी विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. एका पाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. लॉरेन स्टीनकॅम्प 23, जॅन फ्रायलिंक 9, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन 5, गेरहार्ड इरास्मस 7, अलेक्झांडर वोल्शेंक 20, जेजे स्मित 9, रुबेन ट्रम्पेलमन 0, झेन ग्रीन 7 , विलेम मायबर्ग 8, बर्नार्ड शॉल्झ 1,  असे बाद झाले. जॅक ब्रासेल नाबाद 1 धावेवर राहिला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा