AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NAM: पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने केली नामिबियन गोलंदाजांची धुलाई, 57 चेंडूत ठोकलं शतक

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 35व्या सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना सुपर 8 फेरीसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात साहिबजादा फरहानची बॅट चांगलीच तळपली. त्याने शतक ठोकल्याने पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत आहे.

PAK vs NAM: पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने केली नामिबियन गोलंदाजांची धुलाई, 57 चेंडूत ठोकलं शतक
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने केली नामिबियन गोलंदाजांची धुलाई, 57 चेंडूत ठोकलं शतकImage Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2026 | 4:58 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरो सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले आहेत. तसं पाहिलं तर नामिबियाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण या सामन्याकडे अमेरिकेचं लक्ष लागून आहे. कारण हा सामना पाकिस्तानने गमावला तर अमेरिकेला सुपर 8 फेरीत स्थान मिळेल. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याचं महत्व ओळखून पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी सावध सुरूवात केली. पण त्यानंतर धावांची गती वाढवली. 40 धावा असताना सईम आयुबच्या रुपाने पहिला धक्का बसला. पण असं असतानाही साहीबजादा फरहानने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने अवघ्या 57 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील तिसरं शतकं आहे. तर पाकिस्तानकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ठोकलेलं हे दुसरं शतक आहे

टी20 वर्ल्डकप 2014 स्पर्धेत पाकिस्तानकडून अहमद शेहजादने बांगलादेशविरुद्ध नाबाद 111 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता साहिबजादा फरहानने नाबाद 100 धावा केल्या आहेत. साहिबजादाने 58 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 172.41 चा होता. टी20 क्रिकेटमध्ये साहिबजादाचं हे पहिलं शतक आहे. यापूर्वी त्याने नाबाद 80 धावांची खेळी केली होती. साहिबजादा फरहानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 199 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. पहिल्या विकेटसाठी त्याने सईम आयुबसोबत 40, दुसऱ्या विकेटसाठी सलमान आगासोबत 67, तिसऱ्या विकेटसाठी ख्वाजा नाफायसोबत 11, तर चौथ्या विकेटसाटी शादाब खानसोबत 40 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या.

साहिबजादाने शतकी खेळीसह साहिबजादाने इशान किशनला मागे टाकलं आहे. त्याने शतकी खेळी करताना 4 षटकार मारताच इशान किशन आणि शिमरोन हेटमायर यांना मागे टाकलं आहे. साहिबजादा फरहान या स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चार सामन्यात 11 षचटकार मारले आहे. तर इशान किशन आणि शिमरोन हेटमायरच्या नावावर प्रत्येकी 10 षटकार आहेत. पण या दोघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा