AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर हा बडा नेता होणार होता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेमध्ये आला आहे, या संदर्भात अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. यावर बोलताना रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर हा बडा नेता होणार होता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
rohit pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 6:49 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विमानामध्ये असलेलं अतिरिक्त इंधन, डॅमेज झालेला ब्लॅक बॉक्स आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी होणारा विलंब यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे, यावरून अनेक दावे प्रतिदावे होत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत देखील मोठा दावा केला आहे.   मला विलिनीकरणावर बोलायचं नाही, पण एक विषय मांडतो. दोन पक्ष एकत्र आले असते, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत. भावनिकदृष्टीकोनातून, जर विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे झाले असते. विलिनीकरणावर मी बोलणार नाही. कारण चर्चा भरकटते, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसऱ्या गटातील लोकांना विलिनीकरणावर बोलायला आवडतं. आम्ही फक्त घात किंवा अपघात यावर बोलत आहोत. अमोल कोल्हेंना विलिनीकरणाचा विषय माहीत आहे. अमोल कोल्हेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजे ही दादांची इच्छा होती. 13 बैठका झाल्या होत्या. ज्यांच्या घरी बैठका झाल्या, त्यांच्या घरजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासा. ट्रॅफिकचे फुटेज पाहा. नाही तर मंत्री लोढा यांच्या घरासमोरचे सीसीटीव्ही तपासा. दादा 13 वेळा वेगवेगळ्या गाडीतून विलिनीकरणाची चर्चा करण्यासाठी आले होते. घर जयंत पाटील यांचं होतं. जयंत पाटलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, दादांना पार्टी वाढवायची होती, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...