Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?, म्हणत पेडणेकरांचा पलटवार
“जे बाडगे असतात ते जास्त मोठा बांग देतात. संतोष धुरी यांच्या वक्तव्याला मी उत्तर देणार नाही, कारण अशा बांगेला विचारतंय कोण?” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या घडामोडींमुळे ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्ष नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते संतोष धुरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली. संतोष धुरी म्हणाले की, पेडणेकर यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोणत्याही समितीचे पद देण्यात आले नाही. तसेच त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद न दिल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केल्याचेही सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, या टीकेला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी संतोष धुरी यांच्यावर जोरदार पलटवार केला. “जे बाडगे असतात ते जास्त मोठा बांग देतात. संतोष धुरी यांच्या वक्तव्याला मी उत्तर देणार नाही, कारण अशा बांगेला विचारतंय कोण?” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या घडामोडींमुळे ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Published on: Feb 18, 2026 01:30 PM
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...

