Rupali Patil | ही तर शोकांतिका, सत्तेत असूनही… अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटील यांची तीव्र नाराजी!
अजित पवार यांच्या घटनेप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेला 21 दिवस उलटूनही सत्य समोर आले नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. “सत्तेत असूनही अजित दादांच्या घटनेचं सत्य एकविसाव्या दिवशी देखील समोर येत नाही, ही शोकांतिका आहे.
अजित पवार यांच्या घटनेप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेला 21 दिवस उलटूनही सत्य समोर आले नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. “सत्तेत असूनही अजित दादांच्या घटनेचं सत्य एकविसाव्या दिवशी देखील समोर येत नाही, ही शोकांतिका आहे,” असे त्या म्हणाल्या. तपास यंत्रणेच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सत्तेत असूनही तपास यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर येत आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. रुपाली पाटील यांनी तातडीने तपास यंत्रणा कार्यरत करून पारदर्शक पुरावे महाराष्ट्रासमोर सादर करण्याची मागणी केली. अन्यथा ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा ठपका ठेवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या घटनेच्या तपासाबाबत नव्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Feb 18, 2026 05:22 PM
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट

