Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
परळी तालुक्यातील मांडवा शिवारात दुष्काळामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हनुमंत आंधळे यांच्या एक एकर कांद्याचे पीक पाण्याअभावी पूर्णपणे सुकले आहे. बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असतानाही, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे संभाव्य उत्पन्न बुडाले आहे. सरकारने पंचनामे करून तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे परळी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मांडवा शिवारातील शेतकरी हनुमंत आंधळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीला दोन महिने पाणी उपलब्ध असल्याने पिकाची वाढ चांगली झाली होती, मात्र नंतर बोअरचे पाणी आटल्याने संपूर्ण कांद्याचे पीक जागेवरच वाळून गेले आहे.
कांद्यासाठी सुमारे 30 ते 35 हजार रुपये खर्च करून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते, परंतु दुष्काळामुळे हे संपूर्ण पीक आता उद्ध्वस्त झाले आहे. बाजारात कांद्याला सध्या 40 ते 50 रुपये प्रति किलो असा चांगला भाव मिळत असतानाही, शेतकऱ्यांच्या हातातून पीक निसटल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कांद्याची केवळ पात वाढली असून कांद्याची वाढ खुंटली आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Published on: Nov 25, 2026 03:46 PM
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..

