Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री…
पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय परिसरात १०० हून अधिक १०८ रुग्णवाहिका धूळ खात पडून आहेत. आरोग्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी तारीख मिळत नसल्याने त्या रखडल्या आहेत. ग्रामीण भागांत रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे जीव जात असताना, इतक्या रुग्णवाहिका निष्क्रीय असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्याच्या औंध येथील जिल्हा रुग्णालय परिसरात 100 ते 107 रुग्णवाहिका सध्या धूळ खात पडून आहेत. रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने ही 108 रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे, मात्र यातील अनेक रुग्णवाहिका अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.
आरोग्यमंत्र्यांकडून उद्घाटनासाठी तारीख मिळत नसल्याने या गाड्या रखडल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागांत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याची गंभीर परिस्थिती असताना, पुण्यासारख्या शहरात 100 हून अधिक रुग्णवाहिका निष्क्रिय अवस्थेत पडून असणे हे चिंताजनक आहे. या प्रकारामुळे नागरिकांकडून आरोग्यसेवेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लवकरच या रुग्णवाहिकांचे उद्घाटन होऊन त्या सेवेत दाखल व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Published on: Nov 25, 2026 02:16 PM
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...

