AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत हर्षित राणाची जागा कोण घेणार? केकेआरने ठरवलं

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वीच केकेआर फ्रेंचायझीला नजर लागली. मुस्तफिझुर रहमानला काढावं लागलं, तर हर्षित राणा दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकत नाही. मुस्तफिझुरच्या जागी मुजरबानी संघात आला. आता हर्षित राणाचा बदल खेळाडू ठरला आहे.

IPL 2026 स्पर्धेत हर्षित राणाची जागा कोण घेणार? केकेआरने ठरवलं
IPL 2026 स्पर्धेत हर्षित राणाची जागा कोण घेणार? केकेआरने ठरवलंImage Credit source: PTI
| Updated on: Mar 16, 2026 | 8:01 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्स चौथ्यांदा जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी तयारीला लागली आहे. पण 19 व्या पर्वापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाला ग्रहण लागलं. बांगलादेशात होणाऱ्या हिंसाचारामुळे बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला संघातून काढून टाकलं. त्याच्या जागा झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी याने भरून काढली. पण ही जागा भरून काढत नाही तोच हर्षित राणा या स्पर्धेत खेळणार नसल्याचं समोर आलं. दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली पण त्यातून काही सावरलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेला मुकला आहे. असं असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी केकेआर फ्रेंचायझीला धावाधाव करावी लागली. आता त्याची रिप्लेसमेंट केकेआरला मिळाली असून त्यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. रिपोर्टनुसार, सिमरजीत सिंह हर्षित राणाची जागा घेण्याची शक्यता आहे. मागच्या पर्वात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे यंदा केकेआरवर चांगल्या कामगिरीचा दबाव असणार आहे.

सिमरजीत सिंहला घेणार का?

सिमरजीत सिंहला केकेआरने संघात घेतलं तर ही त्याची तिसरी फ्रेंचायझी ठरेल. यापूर्वी सिमरजीत हा सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. त्यासाठी केकेआर फक्त 30 लाख रूपये मोजणार आहे. म्हणजेच हर्षित राणाच्या तुलनेत सिमरजीत सिंहला 3.70 कोटी रुपये कमी मिळतील. हर्षित राणाला केकेआरने 4 कोटी खर्च करून संघात घेतलं आहे. हर्षित राणाला टी20 वर्ल्डकप 2026 च्या सराव सामन्यात दुखापत झाली होती. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली. पण त्यातून अजूनही सावरलेला नाही.

सिमरजीत सिंह IPL करिअर

आयपीएल स्पर्धेत सिमरजीत सिंह पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्सकडून खेलला. आयपीएल स्पर्धेच्या दोन पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. यावेळी त्याने 10 सामन्यात 9 विकेट घेतल्या. तर आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्याने 4 सामन्यात 2 विकेट घेतल्या. सिमरजीत सिंहने आयपीएल स्पर्धेतील 14 सामन्यात 11 विकेट घेतल्या. आता हर्षित राणाच्या जागी संधी मिळाली तर या संधीचं सोनं करण्याचा सिमरजीत सिंहचा प्रयत्न असेल.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं