AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केकेआर फ्रेंचायझीमुळे टीम इंडियाचा हेड कोच होण्यास मदत, गौतम गंभीरने सांगितली पडद्यामागची गोष्ट

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेण्यापूर्वी गौतम गंभीर हा केकेआरचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर गौतम गंभीरच्या हाती टीम इंडियाची सूत्र आली. पण कशी आणि काय झालं ते जाणून घ्या.

केकेआर फ्रेंचायझीमुळे टीम इंडियाचा हेड कोच होण्यास मदत, गौतम गंभीरने सांगितली पडद्यामागची गोष्ट
केकेआर फ्रेंचायझीमुळे टीम इंडियाचा हेड कोच होण्यास मदत, गौतम गंभीरने सांगितली पडद्यामागची गोष्टImage Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 16, 2026 | 7:26 PM
Share

गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून भारताने दोन आयसीसी चषक जिंकले. आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पण गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी गौतम गंभीरचा स्वभाव पाहता टीम इंडियाची घडी बसवता येईल का? वगैरे असे प्रश्न विचारले होते. पण गौतम गंभीरने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 जेतेपद मिळवल्यानंतर राहुल द्रविडने प्रशिक्षकपद सोडलं होतं. त्यानंतर गौतम गंभीरच्या हाती सूत्र आली. आता गौतम गंभीर वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत प्रशिक्षक असणार आहे. असं सर्व असताना गौतम गंभीरची टीम इंडियाचा प्रशिक्षकपदी निवड कशी झाली? आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाचं यात काय योगदान होतं? असे सर्व प्रश्नांची गौतम गंभीरने स्वत: दिली आहेत.

गौतम गंभीरने RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत कोलकाता नाईट रायडर्सचा करिअरवर पडलेल्या प्रभावाचा उल्लेख केला. गौतम गंभीरने स्पष्ट सांगितलं की, आज मी जिथे आहे त्यात कोलकाता नाईट रायडर्सचं खूप मोठं योगदान आहे. गौतम गंभीरने सांगितलं की, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला लीडर बनवण्यात मुख्य भूमिका बजावली. आज जे काही नेतृत्व गुण दिसत आहेत, त्या केकेआरचं मोठं योगदान आहे. कोलकाता नाईट रायडर्ससोबत माझा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. त्यामुळेच टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची खूर्ची मिळाल्याचं गौतम गंभीरने सांगितलं.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेत तीन वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिन्ही विजयात गौतम गंभीर होता हे विशेष.. 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीर कर्णधार असताना जेतेपद मिळवलं. तर 2024 मध्ये केकेआरचा मेंटॉर म्हणून रूजू झाला आणि संघाने जेतेपद मिळवलं. दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर दोन आयसीसी चषक जिंकले आहे. आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेवर लक्ष्य असेल. दरम्यान, गौतम गंभीरच्या कारकि‍र्दीत कसोटी क्रिकेटला हवं तसं यश मिळालं नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल