AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला पण चूक करण्याचा हक्क आहे..! गौतम गंभीरने असं सांगत पुढच्या स्वप्नाचा केला खुलासा

गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भारताने दोन आयसीसी चषक जिंकले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. असं असताना गौतम गंभीरचं एक विधान चर्चेत आलं आहे.

मला पण चूक करण्याचा हक्क आहे..! गौतम गंभीरने असं सांगत पुढच्या स्वप्नाचा केला खुलासा
मला पण चूक करण्याचा हक्क आहे..! गौतम गंभीरने असं सांगत पुढच्या स्वप्नाचा केला खुलासाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 16, 2026 | 3:34 PM
Share

गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून या ना त्या कारणाने चर्चा होत असते. राहुल द्रविडने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर प्रशिक्षकपद सोडलं. यानंतर ही सूत्र गौतम गंभीरच्या हातात आली. त्यानंतर या दीड वर्षांच्या कालावधीत अनेक चढउतार टीम इंडियाच्या वाटेला आहे. अनेकदा टीकाकारांनी अपयशासाठी गौतम गंभीरला लक्ष्य केलं आहे. त्याच्या निर्णयावरून अनेकदा सोशल मीडियावर रान उठवलं. पण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर गौतम गंभीरने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. जेतेपदानंतर गौतम गंभीरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. गौतम गंभीर म्हणाला की, ‘मी पण माणूस आहे. मलाही चूक करण्याचा हक्क आहे. सर्वांना चूक करण्याचा अधिकार आहे. खेळाडू करतात, मी करतो. मागच्या 18 महिन्यात मी अनेक चुका केल्या आहेत.’ इतकंच काय तर गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि चूक झाली तर त्यात काहीच अडचण नाही.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान गौतम गंभीरने आपल्या खेळाडूंना पाठिंबा दिला. सूर्यकुमार यादव फॉर्मात नव्हता. अभिषेक शर्माने फॉर्म गमावला होता. पण गौतम गंभीरने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला. टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘मी त्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वांशी प्रामाणिक होतो. मी प्रत्येक खेळाडूसोबत प्रामाणिकपणे चर्चा केली. मी सर्वांसोबत डोळ्यात डोळे घालून बोलतो. पुढच्या 18 महिन्यांचा जितका कार्यकाळ शिल्लक आहे, तेव्हाही मी असंच करणार आहे.’

गौतम गंभीर म्हणाला की, ‘तुम्ही तुमच्या खेळाडूंवरील विश्वास 3-4 सामन्यात गमवू शकत नाहीत. लोकांना आउट फॉर्म आणि आऊट ऑफ रनमधील फरक कळत नाही. अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म नव्हता.’ गौतम गंभीरने संजू सॅमसनवरही विश्वास ठेवला आणि इशान किशनच्या जागी अभिषेक शर्मासोबत ओपनिंग पाठवलं. त्याने या संधीचं सोनं केलं आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळवला. इतकंच काय तर टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. गौतम गंभीरने REVZSPORTZशी बोलताना सांगितलं की, ‘मला ऑलिम्पिकचा भाग व्हायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी अभिमानाचा क्षण ्सेल.’

Follow Us
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब