AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: ही कुठली… मनोज जरांगे पाटील यांची लक्ष्मण हाकेंवर सडकून टीका, एकाच ओळीत विषय संपवला

Manoj Jarange on Laxman Hake: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज फडणवीस सरकारवर तुटून पडले. पत्रकार परिषदेत त्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जळजळीत प्रतिक्रिया

Manoj Jarange: ही कुठली... मनोज जरांगे पाटील यांची लक्ष्मण हाकेंवर सडकून टीका, एकाच ओळीत विषय संपवला
मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके
| Updated on: Aug 06, 2026 | 12:48 PM
Share

अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटील यांनी आज फडणवीस-शिंदे सरकावर घणाघात घातला. जरांगे यांचा संताप फुटला. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आरोपांची राळ उडवली. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्याचवेळी त्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली. आज जरांगे पाटील यांनी चौफेर तुफान फटकेबाजी केली. ते सरकारवर तुटून पडले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर सडकून टीका

मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यावर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. हा सत्याचा विजय झाला असे हाके म्हणाले. त्यावर आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. मराठ्यांना मी बाप मानलेले आहे. त्यांच्यासाठी तुम्ही रद्द करत असाल तर मी ऐकत नाही. ती कुठली पैदास आहे, ती फार खुश झाली,तुमच्या कश्या पैदशी आहेत, औलादी आहेत असे म्हणत आहे की सत्याचा विजय झाला म्हणून. जरांगे पाटील यांनी नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावर तिखट हल्लाबोल केला.

निवडणूकीत अनेक जागा पडतील

चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट, खासदार संदिपानराव भुमरे या दोन चार लोकांसाठी मी राज्यातले खूप लोकं पाडून टाकीन असा इशारा त्यांनी सरकारला दिला. सध्या तात्पुरते घ्या आणि नंतर रद्द करा असं बावनकुळे यांनी सांगितलं. फडणवीस काहीच बोलले नाही याचा अर्थ त्यांची मुकसमंती आहे. मराठ्यांनो तुम्ही मागे हटू नका सरकार मला एकटं पाडू पाहत आहे, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.

अभ्यासकांवर मोठी टीका

मुंबईतून २९ ऑगस्टला जीआर घेतला. तिथे सर्व हो म्हटले. हे बदलणार मला माहीत होतं. म्हणून विखे पाटलांकडून शब्द घेतला. सुधारीत जीआर करावा लागेल. मी हॉस्पिटलमध्ये असताना आठ अभ्यासक आले. त्यांनी माझा बळीचा बकरा केला. मी या आठजणांना सांगितलं वाचा. बदल करायचं असेल तर सांगा. आठ नऊ जणांपैकी म्हणाले आमचा सनदी अधिकारी आहे. जीआर काढण्याची त्याला अक्कल आहे. आपल्या विचाराचा आहे. त्याला विचारून येतो. जीआर घेऊन गेले. सकाळी ११ वाजता गेले. रात्री ९ वाजता आले. जीआर वाचला. त्या अधिकाऱ्याने सांगितलं, याच्या सारखा जीआर निघू शकत नाही. मराठ्यांचं कल्याण झालं. आता हेच अभ्यासक म्हणतात, जीआरने आरक्षण मिळत नाही. जीआर खोटा आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल