Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील ‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमात एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मिमिक्रीवरून भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील ‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमात एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मिमिक्रीवरून भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. दरम्यान, नागपुरातील एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नागपूर आणि विदर्भातील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीबाबतही भाष्य केले. सोलर मॉड्युल तयार करणाऱ्या कारखान्याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, या कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोलर मॉड्युलची निर्मिती केली जात आहे.
“इतकं अॅडव्हान्स इंटिग्रेशन आज देशात कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्युल या फॅक्टरीमध्ये तयार होत आहे. या माध्यमातून सोलरच्या क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करून पुढे जाण्याचं काम होत आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. या कारखान्याचे भूमीपूजन 2024 मध्ये झाल्याचे सांगत फडणवीस यांनी अल्पावधीतच येथे सुमारे 5 हजार कामगार कार्यरत झाल्याचे नमूद केले. नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्रातील बदलत्या औद्योगिक इकोसिस्टमचे हे एक उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुटीबोरी परिसरात औद्योगिक गुंतवणुकीसाठी उपलब्ध जागेवर मोठी मागणी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “बुटीबोरीमध्ये अतिरिक्त जागा नाही. गुंतवणूकदारांनी जागा घेतल्या आहेत आणि सगळीकडे काम सुरू आहे. आम्ही आता अतिरिक्त बुटीबोरी तयार करत आहोत,” असे ते म्हणाले. महिंद्राला सुमारे 1 हजार एकर जागा देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या दोन-तीन महिन्यांत संबंधित काम सुरू करण्याचा मानस असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, गुंतवणुकीसाठी सध्या प्रतीक्षा यादी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सावनेर परिसरात सुमारे 5 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असून, तिथेही गुंतवणुकीसाठी मागणी नोंदवण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या औद्योगिक विस्तारामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Sep 20, 2026 02:00 PM
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश

