Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! …ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी १५ ऑक्टोबरपासून यूपीआय व्यवहार बंद करण्याचा इशारा दिला आहे. २००० रुपयांवरील यूपीआय पेमेंटवर आकारल्या जाणाऱ्या ०.४% एमडीआर शुल्काला त्यांचा विरोध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शुल्क सर्वसामान्यांवर नसून व्यापाराला पारदर्शकता आणणारे असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी १५ ऑक्टोबरपासून यूपीआय व्यवहार बंद करण्याचा इशारा दिला आहे. २००० रुपयांवरील यूपीआय पेमेंटवर सुधारित एमडीआर (Merchant Discount Rate) शुल्क आकारले जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या शुल्काला देशभरातून विरोध होत असून, पेट्रोल पंप चालक आक्रमक झाले आहेत.
केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, हे शुल्क ग्राहकांकडून नव्हे, तर दुकानदारांकडून आकारले जाईल. तरीही पेट्रोल डिलर्स असोसिएशन ऑफ मुंबईने, पेट्रोल पंपांना या शुल्कातून सूट देण्याची मागणी केली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर १५ ऑक्टोबरपासून पंपांवर यूपीआयचा वापर केला जाणार नाही, असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष चेतन मोदी यांनी दिला आहे. यामुळे पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांना रोख रक्कम जवळ बाळगावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की, यूपीआय बाबत चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात आहे. हे शुल्क सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला भुरदंड देणारे नाही. २००० रुपयांवरील व्यवहारांवर फक्त ०.४% कर लावला आहे, तोही व्यापाऱ्यांकडून वसूल केला जाईल. यूपीआयमुळे व्यापार वाढला आहे आणि व्यवहार अधिक पारदर्शक झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 20, 2026 05:03 PM
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...

