मोठी बातमी! पुण्यात महायुती तुटणार? भाजप निवडणूक स्वतंत्र लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वेळ पडल्यास भाजपा म्हणून निवडणुकीला दोन्ही मतदारसंघात सामोरे जाऊ, असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वेळ पडल्यास भाजपा म्हणून निवडणुकीला दोन्ही मतदारसंघात सामोरे जाऊ. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष घेतील. असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरमध्ये केले आहे. जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे राजकारण सध्या तापत आहे. अशातच वेळ पडल्यास भाजप म्हणून निवडणूक लढू. असे विधान करून जयकुमार गोरे यांनी पुणे मतदारसंघातील राजकारणात नवा ट्विस्ट आणला आहे.
तसेच , सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. रणजीतसिंह मोहिते पाटील म्हणजे , पावसाळा आल्या की छत्र्या येतात आणि उगवतात. असे विधान करून जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना देखील थेट डीवचले आहे. त्यामुळे लोकसभा , विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सोलापूर डीसीसी बँकेतही मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे असा सामना रंगेल अशी शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
एकीकडे जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना डीवचले असताना. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची फळी एकत्रित बसून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा योग्य निर्णय घेईल. वेळप्रसंगी समविचारी लोकांनाही सोबत घेऊन भाजपाचा झेंडा जिल्हा बँकेवर फडकवला जाईल. असेही यावेळी ते म्हणाले आहेत.
वातावरण तापण्याची शक्यता
दरम्यान पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वेळ पडल्यास भाजपा म्हणून निवडणुकीला दोन्ही मतदारसंघात सामोरे जाऊ. असं मोठं विधान जयकुमार गोरे यांनी केलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. दरम्यान पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील चांगली ताकद आहे, त्यामुळे आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची काय प्रतिक्रिया येणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
