मराठा आरक्षण
मराठा आरक्षण सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले होते. आता मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायदा सरकारने तयार करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
Read MoreMaharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस, मराठा समाज आक्रमक..
Maharashtra News LIVE : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे. मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. राज्यात दुष्काळाचे संकट आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Sep 9, 2026
- 9:33 am
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून मराठवाड्यातील वातावरण तापले असताना लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे सुनील बिरादार या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर लातूरसह काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 9, 2026
- 7:56 am
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी तरुणाचं टोकांचं पाऊल, लातूरसह मराठवाड्यात रास्ता रोको, मनोज जरांगे यांच्या एका फोन नंतर काय घडलं?
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणावरून मराठवाड्यात वातावरण तापले आहे. त्यातच काल लातूरमध्ये एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी एक फोन केल्यानंतर काय घडलं?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 9, 2026
- 7:30 am
Manoj Jarange : तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही पण…मनोज जरांगेंना भरत गोगावलेंचा थेट इशारा; शिंदेंवर टीका केल्याने आक्रमक!
मनोज जरांगेंना एवढंच सांगतो की त्यांनी संयम ठेवावा. आमच्या मुख्य नेत्यावर घसरू नये. तो जर बोलला तर एकही मराठा नेता गप्प बसणार नाही, त्याला ऊत्तर देईल... मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णय घेतला आहे, असा इशारा भरत गोगावलेंनी दिला.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 8, 2026
- 6:51 pm
फडणवीस, शिंदेंवर वारंवार बोलणं… उदय सामंत यांचा जरांगेंना मोठा सल्ला; नेमकं काय म्हणाले?
उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना शिंदे-फडणवीसांवरील टीका टाळण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक निर्णय या सरकारने घेतले आहेत. १५ पैकी १२ मागण्या मान्य झाल्या असून, उर्वरित तीन कायदेशीर बाबींमध्ये आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आंदोलन न करण्याचे आवाहन सामंत यांनी केले, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 8, 2026
- 4:03 pm
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला देणार नाही, तर संविधानानुसारच मराठा समाजाला न्याय मिळेल. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर असून, चर्चेची दारं नेहमी खुली आहेत. मराठा समाजाला आतापर्यंत दिलेला लाभ प्रत्यक्ष स्वरूपात दिसला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 8, 2026
- 3:46 pm
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा विखे पाटलांवर जिव्हारी लागणारा घाव; थेटच म्हणाले, तुम्हीच…
मनोज जरांगे पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर मराठा आरक्षणासंदर्भात तीव्र हल्ला चढवला. विखे पाटलांनी मराठा समाजाचे मोठे नुकसान केले, एक वर्ष वाया घालवले आणि देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण केले, असा आरोप जरांगे यांनी केला. त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण प्रक्रिया रखडली. उपोषणाच्या ११ व्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी विखेंना 'खरे बोला' असे आव्हान दिले.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 8, 2026
- 1:31 pm
मनोज जरांगे यांचे समाधान होत नसेल तर… राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका वाक्याने ठिणगी पडणार? मराठा आंदोलनाविषयी म्हणाले काय?
Radhakrishna Vikhe Patil on Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत मध्यरात्री अजून खालावली. मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांच्या आवाहनानंतर त्यांनी सिलाईन घेतली. पण आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आंदोलनाचा नूर पालटण्याची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 8, 2026
- 1:07 pm
Ambadas Danve: हा तर पाळलेला… गुणरत्न सदावर्तें यांच्यावर अंबादास दानवे यांची बोचरी टीका
Ambadas Danve on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली. या वादात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ओढले. त्यानंतर आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी आणि उद्धव सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 8, 2026
- 11:53 am
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह…
मराठा आरक्षणाबाबत वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सूत्रांनुसार, रात्री २ वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक विचारविनिमय झाला. मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला. जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या ११ व्या दिवशी ही घडामोड घडली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 8, 2026
- 10:38 am
Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती अजून खालावली, रात्री अडीच वाजता कुणाचा फोन आला? खडबडून जाग आलेल्या सरकारने काय शब्द दिला?
Manoj Jarange Patil Health Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अजून खालावली. त्यांनी यापूर्वी उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी मध्यरात्री त्यांची तब्येत खालावली, त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले, काय शब्द दिला?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 8, 2026
- 7:57 am
…तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यभरातील मराठ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई मोर्चादरम्यान मराठा आंदोलकांना धक्का लागल्यास अवघ्या दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 7, 2026
- 4:44 pm