Jarange vs Hake : जरांगे प्रगाढ पंडित अन् ज्ञानवान माणूस… पाकिस्तानला त्यांची खूप गरज, हाकेंचा खोचक टोला
लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका करत त्यांना प्रगाढ पंडित संबोधले असून, त्यांची गरज पाकिस्तानात असल्याचे म्हटले आहे. जरांगेंनी व्यवसायात जाऊन काय करायचे, त्यांची युनोमध्ये नेमणूक करावी, असेही हाके म्हणाले. यावर जरांगेंनी मी त्यांना विचारात नाही असे प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील आणि इतर राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी सध्या वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. जरांगे पाटील यांना प्रगाढ पंडित संबोधत, त्यांची आज पाकिस्तानात खूप गरज असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. जरांगे व्यवसायात जाऊन काय करणार आहेत, असा सवाल करत, हाके यांनी त्यांची नियुक्ती युनोमध्ये (UNO) करावी, अशी सूचनाही केली. “किती ज्ञानवान माणूस आहे तो. यांची कुठेतरी आंतरराष्ट्रीय युनो-बिनोमध्ये कुठेतरी नेमणूक करावी,” असे हाके म्हणाले.
यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी, “त्याला बोलतोय ना मी, गिणतच नाही मी त्याला. ते कोण आहे तेही माहित नाही. हे प्रॉडक्ट आमचंच आहे. कारण ते आमच्याच आंदोलनामुळं, मराठ्यांच्या ह्याच्यामुळंच आत्ता उदयाला आलंय ते. त्याच्यावर काय बोलायचं,” असे म्हणत लक्ष्मण हाके यांना महत्त्व देण्यास नकार दिला.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

