Zilla Parishad Election Tally 2026 | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पोस्टल मतांच्या मोजणीला प्रारंभ
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महापालिका आणि महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकांबाबतही नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून, पुणे जिल्हा म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामती म्हटले की पवार असे राजकीय समीकरण आतापर्यंत पाहायला मिळाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महापालिका आणि महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकांबाबतही नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून, पुणे जिल्हा म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामती म्हटले की पवार असे राजकीय समीकरण आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निकालांकडे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, गुहागरमध्येही मतमोजणीला सुरुवात झाली असून, कोकण आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या सर्व ठिकाणी पोस्टल मतांची मोजणी करण्यात येत असून, त्यानंतर EVM मधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे दोन कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे ही दोन कोटी जनता नेमकी कोणाच्या बाजूने उभी राहिली आहे, याचे उत्तर या मतमोजणीच्या निकालातून मिळणार आहे.
Published on: Feb 09, 2026 10:42 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

