AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी… मनोज जरांगे पाटील यांना थेट मुंबई पोलिसांची नोटीस, काय घडतंय?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटलांची अडचण वाढली आहे. मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबई पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी... मनोज जरांगे पाटील यांना थेट मुंबई पोलिसांची नोटीस, काय घडतंय?
| Updated on: Nov 08, 2025 | 3:48 PM
Share

मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटलांची अडचण वाढली आहे. मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबईतील आझाद नगर पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीशीत जरांगे पाटलांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या प्रकरणात जरांगे पाटलांना नोटीस

मार्च-एप्रिलमध्ये मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि आणखी काही सहकाऱ्यांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. यात तपासाच्या अनुशंगाने चौकशी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीत त्यांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जरांगे पाटलांकडून नार्को टेस्टसाठी अर्ज

मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी काल नार्को टेस्ट करण्यासाठी आपण तयार आहे आणि पहिला अर्ज मीच करणार असं सांगितलं होते. आज त्यांनी अर्ज लिहिलेला आहे आणि त्यांचे सहकारी पांडुरंग तारख हे सदरील अर्ज घेऊन जालन्याच्या दिशेने रवाना झालेले आहे. पोलीस अधीक्षकांना हा अर्ज सुपूर्द करण्यात येणार आहे त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रह विभाग न्याय व विधी विभाग यांचा उल्लेख केलेला आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना मुंडे यांनी हे आरोप फेटाळले होते. तसेस मराठा ओबीसींमध्ये वाद लावण्याचे काम जरांगे पाटील करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे हत्येच्या कटात सहभागी असलेल्या काही लोकांची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली होती. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...