Manoj Jarange : मोठी बातमी! कांचन उर्फ कल्पेश साळवेंचा धनंजय मुंडेंसोबतचा फोटो व्हायरल, मनोज जरांगेंशी काय कनेक्शन
Dhananjay Munde-Kalpesh Salve : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी काल केला होता. तर याप्रकरणातील कांचन उर्फ कल्पेश साळवेंचा मुंडेंसोबतचा फोटोही व्हायरल झाला आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी काल केला होता. गोळ्या देऊन अथवा वाहनाचा अपघात करून हत्या घडवून आणण्याचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुंडे यांचा कार्यकर्ता अथवा पीए असलेल्या कांचन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. पाटलांनी पत्रकार परिषदेत नाव घेतलेल्या कांचन उर्फ कल्पेश साळवेचे आ.धनंजय मुंडेंसोबतचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ सुद्धा आला समोर
माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असे सांगत धनंजय मुंडेंचा कांचन नावाचा कार्यकर्ता अटक असलेल्या दोन्ही आरोपींना घेऊन धनंजय मुंडेंकडे गेला अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली होती. यानंतर आता कांचन उर्फ कल्पेश साळवे याचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत चे फोटो समोर आले आहेत. तर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून यामध्ये धनंजय मुंडे आणि कल्पेश साळवे एकमेकांना बोलत असताना दिसत आहे.
धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा
धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे कारण धनंजय मुंडे यांनी अनेक खून केले आहेत अनेकांना ब्लॅकमेलिंग देखील केले आहे त्यामुळे नार्को टेस्ट केल्यावर हे सगळं उघडे पडेल आणि महाराष्ट्रात मोठा भूकंप होईल अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी केले. धनंजय मुंडे हे मोठे ब्लॅकमेलर आहेत. ब्लॅकमेलिंग करून त्यांनी महाराष्ट्रात मोठी संपत्ती गोळा केली. त्यांची राज्यात मोठी गॅंग असल्याचा आरोप डोंगरे यांनी केला.
राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना त्यांनी ब्लॅकमेलिंग केले आहे, म्हणून राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाही. अजित पवारांनाही त्यांनी ब्लॅकमेलिंग केलं असावं म्हणून अजित दादाही मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करत नाहीत. अजितदादांचा दादा पण आता गेला आहे त्यांच्यात देखील आता हिम्मत राहिलेली नाही अशी टीका महेश डोंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. धनंजय मुंडे याांचा गुंड दत्ता खाडे याने मला सुद्धा संतोष देशमुख सारखी हत्या करेल अशी धमकी दिल्याचा महेश डोंगरे यांनी आरोप केला. काल दोन्ही नेत्यांनी दावे-प्रतिदावे केले. त्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तर धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. हे आव्हान स्वीकारल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.
