AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करा, सुनील गावस्कर यांनी अंतिम फेरीपूर्वी दिला सल्ला

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. इतिहास रचण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे. पण टीम इंडियाचा येथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. काही खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दोन बदल सूचवले आहेत.

T20 World Cup 2026 : प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करा, सुनील गावस्कर यांनी अंतिम फेरीपूर्वी दिला सल्ला
T20 World Cup 2026 : प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करा, सुनील गावस्कर यांनी अंतिम फेरीपूर्वी दिला सल्लाImage Credit source: BCCI Twitter/PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 10:51 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता वाढली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जेतेपदासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा अंतिम फेरीपर्यंत प्रवास सोपा नव्हता. भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकले. अमेरिकेला 29 धावांनी, नामिबियाला 93 धावांनी, पाकिस्तानला 61 धावांनी आणि नेदरलँडला 17 धावांनी पराभूत केलं. भारताने चारही सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना धावांचा पाठलाग करताना रोखलं. सुपर 8 फेरीत भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली आणि हा सामना 76 धावांनी गमावला. त्याने झिम्बाब्वेला 72 धावांनी, वेस्ट इंडिजला 5 विकेट राखून पराभूत केलं. उपांत्य फेरीत इंग्लंडला भारताने 7 धावांनी पराभूत केलं. भारताने एक सामना वगळता सर्व सामन्यात धावा रोखून विजय मिळवला आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यांचं आकलन केलं तर दोन खेळाडू टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले आहे. या स्पर्धेतील सामन्यांचं आकलन करून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दोन खेळाडूंना प्लेइंग 11 मधून बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे. सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती यांना बसवण्यास सांगितलं. अभिषेक शर्माऐवजी रिंकु सिंह आणि वरूण चक्रवर्ती ऐवजी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव हे दोन बदल करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अभिषेक शर्माला बसवण्याची जोखिम सूर्यकुमार यादव घेणार नाही. तर वरूण चक्रवर्तीऐवजी कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूझीलंडने साखळी फेरीत चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला होता. अफगाणिस्तानला 5 विकेटने, युएईला 10 विकेटने आणि कॅनडला 8 विकेटने पराभूत केलं आहे. तर दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला 7 विकेटने पराभूत केलं. सुपर 8 फेरीत न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे झाला नाही. श्रीलंकेविरुद्ध 61 धावांनी विजय मिळवला. तर इंग्लंडने 4 विकेट राखून न्यूझीलंडला नमवलं. सुपर 8 फेरीत नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली. तर उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेला 9 विकेट राखून पराभूत केलं. एकंदरीत या स्पर्धेत एक सामना वगळता न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करताना जिंकला आहे.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!