AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या 6 खासदारांचा प्रवेश आज होणार का ? मोठी अपडेट समोर, शिवसेनेच्या वर्धापनादिनी काय घडणार?

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देत बंड पुकारले आहे. पक्षाच्या व्हिपला न जुमानल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. शिंदे गटात तात्काळ प्रवेश टाळत, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच ते सामील होतील. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनी दोन्ही गटांकडून स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, त्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्या 6 खासदारांचा प्रवेश आज होणार का ? मोठी अपडेट समोर, शिवसेनेच्या वर्धापनादिनी काय घडणार?
शिवसेनेच्या वर्धापनादिनी काय घडणार?
| Updated on: Jun 19, 2026 | 8:20 AM
Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केल्याने शिवसेना दुसऱ्यांदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून सर्वत हीच चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चा सुकू झाल्यावर पक्षकाडून त्यांना व्हीप बजावण्यात आला. काल दिल्लीत झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. मात्र या व्हिपला न जुमानता सहा खासदार बैठकीस अनुपस्थित राहिले. मुळे या खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पक्षात झालेल्या या भूकंपाच्या आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन टायगरची सर्वत्र चर्चा असतानाचा, आजा शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेना प्रमुख बळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली मराटी माणसाच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. आज सेनेचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन असून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आल आहे. षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

त्या खासदारांचा प्रवेश कधी ?

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमातच आज, त्या 6 बंडखोर खासदारांचा पक्षप्रवेश होणार का, एकनाथ शिंदे याची घोषणा करणार का असे प्र्शन अनेकांच्या मनात असून सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. मात्र याबद्दल एक मोठी अपडेट समोरा आली आहे. नेस्को येथे शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा खासदार पक्षप्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र त्यात कोणतंही तथ्य नाही. असा कोणताही पक्षप्रवेश 19 तारखेला, म्हणजेच आजच्या कार्यक्रमात होणार नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

कायदेशीर प्रक्रियेनंतर पक्षांतर

परभणीचे संजय जाधव, धाराशीवचे ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशीमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील या सहा खासदारांनी बंडखोरी केली असून पक्षाने व्हिप बजावूनही ते बैठकील अनुपस्थित राहिले. ते शिंदे गटाच आज प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र शिवसेना शिंदे गटाच्या आजच्या मेळाव्यात हे खासदार येणार नाहीत तसेच आज पक्षप्रवेशही होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सदा खासदारांच्या स्वतंत्र गटाचा मान्यता मिळण्यापूर्वी ते अन्य पक्षाच्या व्यासपीठावर गेले तर त्यांची खासदारकी अपात्र ठरवण्यात येऊ शकते. म्हणूच हे सहाही खासदार आजच्या मेळाव्यात नसतील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावरच त्यांचा शिंदेगटात पक्षप्रवेश होणार आहे.

शिंदे- ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होणार असून दणदणती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. 6 खासदारांचे बंड आणि पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ते काय टीकास्त्र सोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्कोमध्ये पार पडणार असून या मेळाव्याद्वारे मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. संपूर्ण गोरेगाव परिसरात, विशेषतः नेस्कोला जाणाऱ्या रस्त्यावर बॅनर आणि झेंडे लावण्यात आले आहेत. आजच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!