Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी… राजकारणातील हालचालींना वेग
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या फुटीच्या चर्चांनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या फुटीच्या चर्चांनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खासदारांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलीस कर्मचारी आणि वाहनांची तैनाती करण्यात आली असून परिसरात सतत गस्त देखील सुरू आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलिसांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून बंडखोर खासदारांच्या सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. आगामी काही दिवसांत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
Published on: Jun 18, 2026 06:34 PM
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...

