AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!

Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!

| Updated on: Jun 18, 2026 | 4:32 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या संसदीय बैठकीस अनेक खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून, याप्रकरणी पक्षाकडून पुढील कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी बोलावण्यात आलेल्या बैठकीलाही काही खासदार अनुपस्थित होते. त्यानंतर पक्षाकडून पुन्हा व्हीप जारी करून संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली. मात्र या बैठकीलाही काही खासदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या खासदारांविरोधात संघटनात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले की, पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या खासदारांव्यतिरिक्त अनुपस्थित राहिलेल्यांविरोधात पक्ष नियमांनुसार प्रक्रिया राबवेल. तसेच या प्रकरणी संसदीय स्तरावर आणि आवश्यक असल्यास न्यायालयीन मार्गाचाही अवलंब केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटातील परिस्थिती चर्चेचा विषय ठरली असून, आगामी काळात पक्ष कोणती भूमिका घेतो आणि संबंधित खासदारांचा पुढील निर्णय काय असतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 18, 2026 04:32 PM

Follow Us