AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगर असते तर फोन नॉट रिचेबल ठेवून पळत गेले नसते – केदार दिघे

| Edited By: | Updated on: Jun 20, 2026 | 8:57 AM
Share

Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला मोठा हादरा बसला. 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी हातघाईची लढाई केली. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्यातून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगर असते तर फोन नॉट रिचेबल ठेवून पळत गेले नसते - केदार दिघे

Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला आहे. तर काल फुटीर खासदारांनी व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. उद्धव सेना षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे सेना नेस्को येथे वर्धापन दिन साजरा करेल. त्यानिमित्ताने मुंबईतील प्रमुख चौकात दोन्ही सेनेची बॅनरबाजी रंगली आहे. आजच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, कुणावर काय निशाणा साधणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

खासदार पाठोपाठ आमदाराही फुटणार असा दावा शिंदे सेनेच आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तर त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेतील नगरसेवकही फुटणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव सेनेपुढे येत्या काळातही मोठे आवाहन असणार आहे. तर उद्या 20 तारखेला मनसेचा मेळावा होईल. राज ठाकरे उद्या राज्यातील घडामोडींवर आणि उद्धव सेना फुटीवर काय फटकारे मारतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान झाले. आता तीन दिवसानंतर निकाल जाहीर होईल. राज्यासह देशावर पावसाने डोळे वटारल्याने दुष्काळाची चाहुल तर लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. मान्सून अद्यापही राज्यात सक्रिय झालेला नाही. राज्यातील अनेक धरणात पाणी तळाला गेलेले आहे. पाणी कपात सुरू आहे. तर मुंबईत बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jun 2026 05:58 PM (IST)

    ऑपरेशन टायगर असते तर फोन नॉट रिचेबल ठेवून पळत गेले नसते – केदार दिघे

    ऑपरेशन टायगर असते तर आपला फोन नॉट रिचेबल ठेवून पळत गेले नसते. लपून-छपून फोन बंद ठेवून पळून जाणार याला ऑपरेशन टायगर म्हणत नाही अशी टीका उबाठाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे.

  • 19 Jun 2026 05:38 PM (IST)

    उबाठाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांचे ओमराजे निंबाळकर यांना आव्हान

    उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना आव्हान दिले आहे. Y+ सुरक्षा हटवुन मतदार संघात यावे जनता तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे. तसेच 2029 ला धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच खासदार होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 19 Jun 2026 05:15 PM (IST)

    रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये तीव्र पाणीटंचाई, उत्पादन बंद

    लोटे एमआयडीसीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने घरडा केमिकल्सने सर्व उत्पादन युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याअभावी कंपनीचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले असून प्रोडक्शन बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

  • 19 Jun 2026 04:54 PM (IST)

    संजय दिना पाटील यांच्याकडून शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, पण…

    खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये फक्त बाळासाहेबांचा फोटो आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डावललं. आता एकनाथ शिंदेच्या व्यासपीठावर येणार का? याकडे लक्ष लागून आहे.

  • 19 Jun 2026 04:50 PM (IST)

    अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

    अमेरिकेत फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • 19 Jun 2026 04:37 PM (IST)

    बेस्ट कर्मचारी संपासंदर्भात सरनाईकांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

    आजपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेस्ट कर्मचारी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात ही बैठक होत आहे.

  • 19 Jun 2026 04:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचे सहा नाही तर सात खासदार पक्षांतराच्या तयारीत होते- रामदास कदम

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाते सहा नाही तर सात खासदार पक्षांतराच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट शिंदे शिवसेनेच्या रामदास कदम यांनी केला आहे. सातव्या खासदारानेही पत्रावर सही केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. काही गोष्टींवर अडल्याने त्याने माघार घेतल्याचं रामदास कदम म्हणाले.

  • 19 Jun 2026 04:20 PM (IST)

    आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन सोहळा, बंडखोरीमुळे सभेकडे लक्ष

    आज शिवसेना शिंदे आणि शिवसेना उबाठा यांचा 60वा वर्धापन दिन सोहळा होत आहे. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा वर्धापन दिन सोहळा चर्चेत आला आहे. ठाकरे- शिंदेंच्या मेळाव्याकडे राज्याच्या नजरा लागून आहेत. फुटलेले खासदार शिंदेंच्या मंचावर येणार का? असा प्रश्न आहे. त्यामुळे काय होतं? याकडे लक्ष लागून आहे.

  • 19 Jun 2026 04:04 PM (IST)

    रिलायन्सच्या संचालक मंडळाने जिओ आयपीओला दिली मंजुरी

    “रिलायन्स बोर्डाने जिओ आयपीओला मंजुरी दिली आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा आज दाखल केला जाईल. ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी या प्रकल्पाचे नेतृत्व करतील,” असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज कंपनीच्या 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सांगितले.

  • 19 Jun 2026 03:58 PM (IST)

    11 वर्षांपासून फरार असलेला नक्ष समर्थक अखेर जेरबंद

    अकरा वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थकाला अखेर गडचिरोली पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 2007 पासून 2015 पर्यंत या कालावधीत एकूण 21 गुन्हे या नक्षल समर्थकावर दाखल होते. हत्या, जाळपोळ, धमकी देणे, माओवाद्यांचा प्रचार व प्रसार, असे अनेक गुन्हे आरोपीवर दाखल आहेत. हा आरोपी पोलिसांना गेल्या 11 वर्षांपासून चकमा देत होता, अखेर त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे.

  • 19 Jun 2026 03:45 PM (IST)

    मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन, सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

    मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या नागरिकांना काळ्या रंगाचे कपडे, तसेच काळ्या रंगाचा पावर बॉक्स घेऊन सभागृहात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. सहा खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर कोणी विरोध करू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

  • 19 Jun 2026 03:31 PM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावातून 56 आरोपींना अटक

    मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावातून 56 आरोपींना अटक

    पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन

    हलखेडा,मधापुरी, जोंधणखेडा चारठाणा या गावात कारवाई

    या कारवाईमध्ये 20 लाख रोख रक्कम कॅश 300 ग्राम सोने 4 किलो चांदी दोन गावठी कट्टे व 3 जिवंत काडतुस

    1 नग हरणाचे कातडे 1 कोल्ह्याचे कातडे 1 सशाचे कातडे 4 चार चाकी वाहने व 6 दूचाकी 30 मोबाईल फोन जप्त

  • 19 Jun 2026 03:10 PM (IST)

    गंगाखेडमध्ये भंगारच्या गोडाऊन सह तीन घरांना भीषण आग

    परभणीच्या गंगाखेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या भंगारच्या गोडाऊन सह तीन घराला भीषण आग

    आगीत गोडाऊन आणि घरातील साहित्य जळळून खाक

    आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ

    घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल

    आगीव नियंंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाकडून प्रयत्न सुरू

    आगीचं कारण अद्याप अस्पष्ट..

    घटनेत कुठलीही जीवित हानी नाही, मात्र मोठी वित्तहानी

  • 19 Jun 2026 01:55 PM (IST)

    घाटकोपरमध्ये बेस्ट बसमधून प्रवाशांना खाली उतरवल्याचा प्रकार समोर

    घाटकोपरमध्ये बेस्ट बसमधून प्रवाशांना खाली उतरवल्याचा प्रकार समोर… देवनार इथे जाणारी 382 नंबरची बस रस्त्यावरून जात असताना घडला प्रकार.. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली असून सर्व बस बंद ठेवण्यात येत आहेत..

  • 19 Jun 2026 01:45 PM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले… अमेरिका आणि इराणमधील सामंजस्य करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारावर सकारात्मक परिणाम… ‘हार्मुझच्या सामुद्रधुनी’तून पुरवठा वाढण्याची शक्यता… बेंट क्रूडच्या ऑईलच्या दरात 0.68 टक्क्यांची घसरण..

  • 19 Jun 2026 01:30 PM (IST)

    बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणी डॉ. तुकाराम मोटेला अटक

    उरुळी कांचन पोलिसांकडून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणी डॉ. तुकाराम मोटेला अटक… न्यायालयाने आरोपीला 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पत्नीवरही गुन्हा दाखल…

  • 19 Jun 2026 01:15 PM (IST)

    कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या चार तास बंद राहणार

    कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या चार तास बंद राहणार… केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहणार… सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत मंदिर बंद राहणार…

  • 19 Jun 2026 12:55 PM (IST)

    दादांनी आज मला इथे बोलावलं आहे – प्रसाद लाड

    “दादा केव्हा काहीतरी काम होईल तेव्हा मी भोजनसाठी तुमच्याकडे येईन. दादांनी आज मला इथे बोलावलं आहे. इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीही ताकद थांबवू शकत नाही. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत” असं प्रसाद लाड म्हणाले.

  • 19 Jun 2026 12:51 PM (IST)

    शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी ती आम्ही दिलेली – प्रसाद लाड

    “शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी ती आम्ही दिलेली नाही. शिंदे समितीला 58 लाख नोंदी मिळाल्या. समाजाची लोक घराघरात गावात जाऊन नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या नातेवाईकांना मदत मिळण्यास सुरुवात. मृत आंदोलकांच्या नातेवाईकांच्या नोकरीबाबद GR निघालाय” अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

  • 19 Jun 2026 12:48 PM (IST)

    प्रसाद लाड अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला

    वाटाघाटीचा सेतू पूर्ण झाला असं मी म्हणणार नाही. पण काही गोष्टी पूर्णत्वाकडे जात आहेत, याचा आनंद आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं, या बद्दल त्यांचे आभार. प्रसाद लाड अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

  • 19 Jun 2026 12:29 PM (IST)

    भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात उबाठा सेना रस्त्यावर उतरली

    शिंदे गटात गेलेल्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात उबाठा सेना रस्त्यावर उतरली आहे. उबाठा सेनेतून शिंदे गटात गेलेल्या वाकचौरे विरोधात उबाठा सेना आक्रमक झाली आहे. श्रीरामपूर राहुरी मार्गावरील बेलापुर येथे उबाठा सेनेकडून रास्ता रोको करण्यात आला. भाऊसाहेब वाकचौरे विरोधात संतप्त शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या फोटोला चपलांचा हार घालत मारले जोडे.

  • 19 Jun 2026 12:15 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची घमेंड अजून कमी झालेली नाही – निलेश राणे

    ठाकरेंचे 10-12 आमदार फुटले तर आश्चर्य वाटायला नको. निलेश राणे यांचा वर्धापन दिनी मोठा गौप्यस्फोट. संजय राऊत ही उबाठाला लागलेली कीड आहे. उद्धव ठाकरेंची घमेंड अजून कमी झालेली नाही अशी टीका निलेश राणे यांनी केली.

  • 19 Jun 2026 12:13 PM (IST)

    बाळासाहेबांचे विचार जपण्याचे काम पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी केलं – शंभूराज देसाई

    “शिवसेनेचा वर्धापन दिन नेहमीप्रमाणे उत्साहाच्या वातावरणात साजरा करतोय. शिवसेनेचे राजकीय जडणघडणीत अनेक स्थित्यंतरं आली आहेत. शिवसेनेची स्थापना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांना भक्कम साथ धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी दिली. ज्वलंत हिंदुत्वाचा विचार मनामध्ये रुजवण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. प्रत्येक उंबऱ्याच्या आत शिवसैनिक असला पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार जपण्याचे काम पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी केलं असून हे काम अत्यंत जोमाने पुढे नेलं आहे. गेल्या चार वर्षात शिवसेनेचा झंजावात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे” असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

  • 19 Jun 2026 12:01 PM (IST)

    गडचिरोली स – सागवान तस्करीच्या विरोधात वन विभागाची मोठी कारवाई

    गडचिरोली सिरोंचा वनविभागातील आसरअली वनपरिक्षेत्र अंतर्गत सागवान तस्करीच्या विरोधात वन विभागाने मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात सागवान लठ्ठे जप्त केले.

    चिंतारेवला जंगल परिसरात बैलगाड्याने मोठ्या प्रमाणात वन तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला पहाटे मिळाली.  फिल्मी स्टाईलने वन विभागाने नदीपात्राच्या परिसरात दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वन तस्करांचा पाठलाग केला. याप्रकरणी 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

  • 19 Jun 2026 11:38 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट

    शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.  बाळासाहेबांचा भाषण करतानाचा फोटो उद्धव ठाकरेंनी पोस्ट केला आहे.  किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लोणी – कुसुमाग्रजांच्या या ओळीही उद्धव ठाकरे यांनी या पोस्टसोबत लिहील्या आहेत.

  • 19 Jun 2026 11:35 AM (IST)

    गोंदिया – भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी

    गोंदिया :-  -भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी. गटनेत्याने पक्षाशी दगाबाजी केल्याचा आरोप  करण्यात आला. अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आहेत. पक्षविरोधी मतदान केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.

  • 19 Jun 2026 11:32 AM (IST)

    बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुखांची उद्या मातोश्रीवर बैठक

    बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुखांची उद्या मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली.  ठाकरे सेनेच्या 6 जिल्हाप्रमुखांची उद्या बैठक होईल. आज वर्धापन दिन असल्यामुळे उद्या ही बैठक बोलावण्यात येणार आहे.

  • 19 Jun 2026 11:21 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 4 हजार 600 रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल 15 हजार रूपयांनी घसरले.  सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 948 रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 38 हजार 960 रुपये झाले आहेत.

  • 19 Jun 2026 11:07 AM (IST)

    सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांविरोधात आंदोलन

    सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं.  शहरातील गणपती घाटावर फुटीर खासदारांचे प्रतिकात्मक दशक्रिया विधी करण्यात येत आहेत.  शिवसेनेच्या सहा खासदारांनी वेगळा गट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

  • 19 Jun 2026 10:57 AM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती

    शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. पक्षाचा वर्धापन दिन तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी महाआरतीचा आयोजन करण्यात आलं. सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने ही महाआरती करण्यात येत आहे.

  • 19 Jun 2026 10:43 AM (IST)

    चाळीसगाव हादरले, दगडाने डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून

    दगडाने डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.  अक्षय पाटील असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बसस्थानक परिसरात गाडी लावण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना झाली आहे.

  • 19 Jun 2026 10:30 AM (IST)

    श्री क्षेत्र भीमाशंकरात सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू; पहाटेपासून भाविकांची गर्दी

    मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे सध्या सकाळी 7 ते 11 या चार तासांदरम्यानच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना पहाटेच येथे पोहोचावे लागत आहे. सर्वसामान्यांना दर्शनाची संधी उपलब्ध झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मर्यादित वेळेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 19 Jun 2026 10:20 AM (IST)

    संजय देशमुख फुटले तरी ठाकरेंचा भगवा झेंडा फडकवत राहिल, दिग्रस येथील शिवसैनिकांचा निर्धार

    यवतमाळ -वाशिमचे खासदार संजय देशमुख हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणारं असल्याची शक्यता असतांना त्याचं गाव असलेल्या दिग्रस मधील शिवसैनिक मात्र चांगलेच आक्रमक झालेत. १० पक्ष बदलेल्या संजय देशमुख यांना आम्ही खासदार घडवलं मात्र मात्र आता आम्हीच त्यांना पाडू असा इशारा हे शिवसैनिक देताहेत.

  • 19 Jun 2026 10:10 AM (IST)

    आत ऑपरेशन चौदा ,चौदा आमदार फुटण्याच आमदार बांगर यांचे संकेत

    संजय राऊत पागल आहेत त्यांच्या नादी लागू नये, तुझ्यात लय गुर्मी आहे तू लय बोलतोस इथून पुढे खासदार होऊन दाखव. आमदार संतोष बांगर यांनी राऊत यांच्या तुडवा ह्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • 19 Jun 2026 10:05 AM (IST)

    धुळे जिल्ह्यातील पाऊस लांबला जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% जलसाठा

    धुळे जिल्ह्यातील पाऊस लांबला जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% जलसाठा शिल्लक राहिला आहे. धुळे जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे 45 लघु प्रकल्प आहेत. वाढलेल्या तापमानामुळे आणि बाष्पीभवनामुळे लघु प्रकल्पामधील साठा जलद गतीने कमी झाला. लवकर पाऊस न पडल्यास ग्रामीण भागामध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 19 Jun 2026 09:50 AM (IST)

    सीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा झेंडा उंचावला; सोहन मांजरेकर देशात तिसरा

    डोंबिवलीच्या सोहन मांजरेकरची सीए अंतिम परीक्षेत देशात तिसरी रँक; 78.83 टक्के गुणांसह घवघवीत यश.यापूर्वी सीए इंटरमिजिएटमध्ये देशात सहावी रँक; शिस्तबद्ध अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यामुळे यश संपादन. सोहनच्या यशाने डोंबिवलीत जल्लोषाचे वातावरण; कुटुंबीय, मित्रमंडळींकडून

  • 19 Jun 2026 09:40 AM (IST)

    हिंगोली-खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हार्दिक अभिनंदनाचे पोस्टर झळके

    शिवसेना आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या भावजई नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी शहरातल्या चौका चौकात लावले पोस्टर. नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे आशयाचे आमदार बांगर यांनी हिंगोली शहरात लावले पोस्टर

  • 19 Jun 2026 09:30 AM (IST)

    शेतातील विजेच्या खांब्यांवरून तार चोरून नेल्याच्या घटनांमध्ये वाढ

    पाऊस नसल्याने आधीच शेतकरी चिंतेत असतांना तार चोरल्या गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..जवळपास दोन डीपीवरील पंधरा ते वीस पोलांवरून तार चोरून नेल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठी समस्या उभी झाली आहे. वारंवारच्या घटनेमुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात पोलिसांकडून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे

  • 19 Jun 2026 09:23 AM (IST)

    बेस्ट बंदचा प्रवाशांना फटका

    दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांची मोठी गर्दी.. आज बेस्ट बंदची हाक दिली आहे नंतर प्रवासांची टॅक्सीने जाण्यासाठी मोठी लाईन. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर टॅक्सी साठी प्रवाशांची मोठी लाईन..

  • 19 Jun 2026 09:22 AM (IST)

    कल्याण स्टेशनसमोर खुलेआम ‘ओपन बार’; मद्यपींच्या हैदोसाचा व्हिडीओ व्हायरल

    कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील परिसरात रात्रीच्या वेळी खुलेआम मद्यपान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मद्यपींचा ‘दारू दरबार’ भरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घरी परतणाऱ्या महिला प्रवाशांना मद्यपींच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत असून सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

  • 19 Jun 2026 09:06 AM (IST)

    खासदार संजय देशमुख यांच्या घरासमोर सलग तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त कायम

    ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असतांना या सहा खासदारांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आलीये. मात्र यवतमाळ -वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड रोष बघायला मिळतोय त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हनुन त्यांच्या दिग्रस येथील घरासमोर सलग तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.

  • 19 Jun 2026 09:00 AM (IST)

    मान्सून लांबल्याने चाऱ्याचे गंभीर संकट

    राज्यात जून महिना सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना हिरव्या चाऱ्याऐवजी वाळलेला सुका चारा टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून. एकीकडे चाऱ्याची कमतरता तर दुसरीकडे वाढलेला खर्च यामुळे दूध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास आगामी काळात चारा टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पशुधन आणि दूध उत्पादनावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे.

  • 19 Jun 2026 08:50 AM (IST)

    गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथे मानवी वस्तीत शिरला बिबट्या…

    गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथे पहाटे काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तो तेथून लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून बाहेर निघाले. बिबट्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी लांजेवार यांच्या घराकडे मोठी गर्दी केली. मात्र गर्दीचा फायदा घेत बिबट पुन्हा तेथून बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात दिसून आला. यावेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. यानंतर बिबट मेश्राम यांच्या घराजवळील एका पडक्या घराच्या परिसरात दिसून आला. वनविभागाने त्या ठिकाणी रेस्क्यूसाठी प्रयत्न केले, मात्र बिबट पुन्हा तेथून निसटण्यात यशस्वी झाला. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.

  • 19 Jun 2026 08:40 AM (IST)

    व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविक एकाच रांगेत

    इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिरात सर्वसामान्यांनी व्हीआयपी एकाच रांगेत आहेत. तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी कल्चरला आळा बसला. ५०० रुपये, २०० रुपये देणगी दर्शन व धर्मदर्शन रांगा भुयारी मार्गात एकत्र दिसले. सर्व भाविकांना आता एकाच ठिकाणाहून सिंहाच्या गाभाऱ्यातून देवीचे दर्शन होणार आहे. देणगीदार व सामान्य रांगेतील भाविकांमधील फरक संपुष्टात आला आहे. सिंहासन पूजा व अभिषेक पूजा सुरू असतानाही देणगी दर्शन अखंड सुरु राहणार आहे.

  • 19 Jun 2026 08:30 AM (IST)

    उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाकडे धाराशिवच्या शिवसैनिकांची पाठ?

    धाराशिव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणारे शिवसैनिक यंदा तुलनेने कमी उत्साह आहे. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील कार्यकर्ते दिशाहीन झाल्याची चर्चा आहे.

  • 19 Jun 2026 08:20 AM (IST)

    शिंदे गटाच्या मेळाव्यात फुटीर खासदार?

    आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही शिवसेनेचे मेळावे मुंबईत होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे.शिंदे गटाचा आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडलेले 6 खासदार आज या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नेस्को सेंटरवर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण गोरेगाव परिसरात, विशेषतः नेस्कोला जाणाऱ्या रस्त्यावर बॅनर आणि झेंडे लावण्यात आले आहेत..

  • 19 Jun 2026 08:10 AM (IST)

    राजाभाऊ वाजे यांच्या स्वागताची जोरदार तयारी

    ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत होणार आहे. इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी देत राजाभाऊ वाजे यांचे स्वागत होणार आहे.

  • 19 Jun 2026 08:00 AM (IST)

    शिवसेना वर्धापनदिनी बॅनरवॉर

    ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापनदिनी मुंबई ठिक ठिकाणी गद्दार बदलले पण विचार नाही या आशयाचा बॅनरबाजी करण्यात आली तर शिंदे शिवेसनेकडून जनता शिवसेना, मनात शिवसेना असे बॅनर झळकले आहेत. ऑपरेशन टायगरमुळे मुंबईत बॅनरवॉर रंगले आहे.

Published On - Jun 19,2026 7:58 AM

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!