मुंबईच्या महागणपती येथे धक्कादायक घटना, 5 जणांना विद्युत शॉक, एक जण..
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. त्यातच आता धक्कादायक बातमी पुढे येत आहे. मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 5 जणांना विद्युत शॉक लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येतंय. या घटनेने मोठी खळबळ उडाली.

मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 5 जणांना विद्युत शॉक लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येतंय. या घटनेने मोठी खळबळ उडाली. काळाचौकीच्या महागणपती येथे रात्री उशिरा जवळपास 2 च्या सुमारास ही घटना झाल्याची अग्निशमन दलाकडून माहिती मिळतंय. एकूण 5 जणांना मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात 2 मुलं आणि 3 मुलगी असून सर्व जण 8 ते 20 वयोगटातील आहेत. रुग्णांपैकी एका मुलीला उपचारासाठी परेल येथील गोल्बल रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मसीनामध्ये 3 रुग्ण आयसीयूमध्ये भर्ती असून त्यांच्यावर उपचार शुरु आहे. रुग्णापैकी एक मुलगी जवळपास 8 वर्षांची असून तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सदर घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.
अग्निशमन दल, स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. नक्की काय घडले याचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या संख्येने गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यातच ही घटना घडल्याचे कळतंय. मात्र, नक्की काय घडले याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. सध्या काहींवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात गेल्या सहा दिवसांत 53 हजार 852 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले असून 68 हजार 633 किलो निर्माणने संकलित करण्यात आले महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नदीच्या घाटांसह शहराच्या सर्वच भागात सोसायटीत सार्वजनिक जागा या ठिकाणी विसर्जनाची सुविधा केली आहे. गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड, उपनगरातून येणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) 147 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
गौरी-गणपती विसर्जनानंतर भाविकांची गर्दी वाढते. त्यामुळे 17 ते 25 सप्टेंबर या काळात या विशेष बस रात्रभर धावणार आहेत. मुख्य बस स्थानकांवरून पुणे मनपा भवनपर्यंत गणेशभक्तांना ही सेवा दिली जाणार आहे. विरारच्या टेंभीपाडा गावातील वैती परिवाराच्या गणरायासमोर IAS तुकाराम मुंढे यांचा देखावा साकारला आहे. या देखाव्यात संत तुकाराम महाराज यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्यासोबतच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे आणि आपल्या प्रशासकीय कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
