मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी कैलास हिवराळे यांची नियुक्ती, गेल्या 32 वर्षापासून कार्यरत

मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी कैलास हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Kailash Hiwarale as Chief of Mumbai Fire Brigade)

मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी कैलास हिवराळे यांची नियुक्ती, गेल्या 32 वर्षापासून कार्यरत

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी कैलास हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलप्रमुख शशिकांत काळे यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘राष्ट्रपती पदक’ पुरस्कारासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती पुरवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे पदावरुन हटवण्यात आलं आहे. (Appointment of Kailash Hiwarale as Chief of Mumbai Fire Brigade)

मुंबई अग्निशमन दल प्रमुखपदी नियुक्ती झालेले कैलाश हिवराळे हे गेल्या 32 वर्षापासून अग्निशमन दलात कार्यरत आहेत. हिवराळे हे परिमंडळ-२ चे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी होते. त्यामुळे त्यांना हा पदभार सांभाळून प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांना उपायुक्त पदी बढती मिळाल्याने आहे. त्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये शशिकांत काळे यांच्यावर अग्निशमन दलाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र काळे यांनी राष्ट्रपती पुरस्कारासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याची समोर आलं होतं.

या गंभीर प्रकारामुळे काळे यांच्यावर कठोर कारवाई शकते. त्यामुळे त्यांची सहआयुक्त सामान्य (प्रशासन) मिलिंद सावंत यांच्यामार्फत खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे काळे यांची खात्यांतर्गत चौकशी होईपर्यंत त्यांना अग्निशमन दल प्रमुखपदावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत. (Appointment of Kailash Hiwarale as Chief of Mumbai Fire Brigade)

संबंधित बातम्या : 

साकीनाक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, भीषण आगीत 5 होरपळले, एका मुलीचा मृत्यू

मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI