AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर, विशेष कोर्टाकडून…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे. कोर्टाकडून या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला दिलासा देण्यात आला. काही तासांसाठी तो जेलच्या बाहेर जाणार आहे. कोर्टाकडून त्याला मंजूर देण्यात आली.

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर, विशेष कोर्टाकडून...
Santosh Deshmukh case
| Updated on: Mar 08, 2026 | 12:21 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर थेट आरोप करण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपी तुरूगांत असून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध गेल्या कित्येक महिन्यांपासून घेतला जातोय. मात्र, पोलिसांच्या हाती काही तो येत नाही. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला दिलासा मिळाला. भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता त्याला त्याच्या गावी जाण्याची परवानगी कोर्टाने दिली. मात्र, ही परवानगी देताना काही नियम आणि अटी दिल्या आहेत, ज्याचे पालन आरोपीला करावे लागणार आहे. जयराम चाटे याला पोलिस बंदोबस्तमध्ये घेऊन गेले जाणार आहे. त्यानंतर काही तासात त्याला पुन्हा तुरूंगात आणले जाईल.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. दिवंगत भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी 13 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला.

आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली होती.  आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. पण कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एक दिवसाची मर्यादित परवानगी जयराम चाटे याला दिली आहे.

तब्बल 14 महिन्यानंतर जयराम चाटे हा काही तासांसाठी तुरूंगाच्या बाहेर येईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कोणीही आरोपी बाहेर येऊ शकला नाही. आता काही तासांसाठी 14 महिन्यानंतर जयराम चाटे त्याच्या गावी धार्मिक विधी करण्याकरिता जाईल आणि परत त्याला तुरूगांत ठेवले जाणार आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....