AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

११७ कोटींचे ११ बंगले, साडे १३ कोटींच्या ७ कार…देशाचे दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री विजय, पहिला क्रमांक कोणाचा ?

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय हे देशातील दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत मुख्यमंत्री आहे. मात्र, देशातील पहिल्या क्रमाकांचे श्रीमंत मुख्यमंत्री कोण माहिती आहेत का ?

११७ कोटींचे ११ बंगले, साडे १३ कोटींच्या ७ कार...देशाचे दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री विजय, पहिला क्रमांक कोणाचा ?
vijay thalapathy
| Updated on: May 11, 2026 | 9:50 PM
Share

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्याकडे ६४८ कोटींची संपत्ती आहे. ते तामिळनाडूचे दुसरे सर्वात श्रीमंत आमदार आहेत.तसेच ते देशाचे दुसरे सर्वात श्रीमंतमुख्यमंत्री देखील आहेत. पहिल्या क्रमांकावर आंध्रप्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा नंबर आहे. चंद्रबाबू नायडू यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे.

तामिळनाडूचा विचार करायचा झाला तर येथे सर्वाधिक श्रीमंत आमदार रोझ मार्टिन आहेत. त्यांच्याकडे ५,८६३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. लीमा रोझ मार्टीन लालगुडी येथील AIADMK च्या आमदार आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे आमदार थलपती विजय आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विजय यांच्या पक्षाचे टीव्हीकेचे आमदार आधव अर्जून आहेत, त्यांच्याकडे ५३४ कोटींची संपत्ती आहे.

विजय यांच्याकडे काय-काय आहे?

निवडणूक शपथपत्रानुसार विजय यांच्याकडे एकूण ६४८.८५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात ४२६.२० कोटी चल आणि २२२.६५ कोटीची अचल संपत्तीचा समावेश आहे. विजय यांच्यावर ७.६३ कोटींचे कर्ज देखील आहे.

विजय यांनी ३३०.४८ कोटी रुपये बँकेत ठेवले आहेत. १९.३७ लाख रुपयांचे शेअर आहेत. ७५.५० कोटी रुपयांहून जास्त त्यांनी कर्ज दिले आहे.एवढेच नाही तर विजय यांच्याकडे १३.५२ कोटी रुपयांहून जास्त किंमतीच्या ७ कार आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये सर्वात महागडी कार Tata Caravan असून तिची किंमत ६ कोटींहून जास्त आहे. त्यांच्याकडे ६.४७ कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आहेत.

विजय यांच्याकडे २२२ कोटीहून अधिक अचल संपत्ती आहे.त्यात ११७ कोटींचे तर केवळ बंगले आहेत. विजय यांच्या नावावर १० आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर १ बंगला आहे. याशिवाय ८२.८१ कोटी रुपयांची कमर्शियल बिल्डींग आहे. त्यांच्याकडे २२ कोटींच्या जमीनीसोबत २० लाख रुपयांची शेतीची जमीन देखील आहे.

चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू देशाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१.८३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. चंद्रबाबू नायडू यांच्यावर १०.३८ कोटींची उधारी आहे. नायडू यांच्याकडे ८१०.४२ कोटी रुपयांची चल आणि १२१.४१ कोटींची अचल संपत्ती आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणूक शपथपत्रात चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले होते की त्यांच्याकडे ७६७.४४ कोटी रुपयांचे शेअर वा बाँड आहेत. त्यांच्याकडे ३.२४ कोटीची ज्वेलरी आहे. याशिवाय चंद्रबाबू नायडू यांच्याकडे ५५ कोटी रुपयांची शेती जमीन देखील आहे. ७७.३३ लाख रुपयांचे प्लॉट आहेत. ३० कोटी रुपयांहून जास्त किंमतीच्या कमर्शियल बिल्डींग आहेत. ३५.५३ कोटी रुपयांचे दोन बंगले आहेत.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक