इस्रायली स्वातंत्र्य दिनासाठी नेतान्याहू यांचे PM मोदींना आमंत्रण, मशाल प्रज्वलित करणार, कॅप्टन मच्छार होणार सामील ?
नेतान्याहू यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, आपण आपले मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि इस्रायलच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान भारतीय वैमानिकाबरोबर मशाल प्रज्वलित करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आहे. नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एका मशाल प्रज्वलित करण्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली प्रवाशांचे प्राण वाचवणारा पायलट स्मित मच्छार या दोघांना आमंत्रण दिले आहे. एक्सवर पोस्ट करुन नेतान्याहू यांनी हे आमंत्रण देत दोन्ही देशांच्या मैत्रीसंबंधाचा उल्लेखही केला आहे.
येथे पोस्ट वाचा –
मैंने अपने मित्र, भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से बात की और उन्हें इज़राइल के स्वतंत्रता दिवस पर वीर भारतीय पायलट के साथ मशाल प्रज्वलित करने के लिए आमंत्रित किया।
मोदी ने निमंत्रण के लिए मुझे धन्यवाद दिया और कहा कि ज़मीन पर और हवा में, भारत और इज़राइल आतंकवाद के ख़िलाफ़ मिलकर लड़ रहे हैं। उन्होंने हमारे बीच के मज़बूत और वर्षों पुराने संबंधों की भी सराहना की। 🇮🇱🇮🇳
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) October 22, 2026
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पोस्टनुसार या कार्यक्रमाला मोदी यांच्या सोबत एक बहादूर भारतीय पायलट स्मित मच्छार देखील सामील होतील. नेतान्याहू यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की आपण पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो आहोत आणि त्यांना इस्रायली स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी भारतीय पायलटसोबत मिळून मशाल प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे आणि या आमंत्रणासाठी आभार व्यक्त केले आहेत.
येथे पोस्ट वाचा –
Received a phone call from Israeli Prime Minister Benjamin Netanyahu. We reviewed the sustained momentum in our bilateral ties and reaffirmed our commitment to further strengthening our partnership.
We also exchanged views on recent developments in West Asia and underscored the urgent need to restore peace and stability in the region.
@netanyahu
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2026
“मी माझे मित्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, एका शूर भारतीय वैमानिकासोबत मिळून एक विशेष संदेश (बीकन) देण्यासाठी निमंत्रण दिले आहे. मोदींनी या निमंत्रणाबद्दल माझे आभार मानले आणि म्हणाले की, जमिनीवर असो वा आकाशात, भारत आणि इस्रायल मिळून दहशतवादाविरुद्ध लढा देत आहेत. त्यांनी दोन्ही देशांमधील धाडसी आणि दीर्घकालीन संबंधांबद्दल दाद दिली,” असे नेतान्याहू यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
