Sunil Tatkae : अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, सुनेत्रा वहिनींना…सुनिल तटकरेंनी भूमिका केली स्पष्ट!
19 ऑक्टोबर रोजी सुनेत्रा पवार या दिल्लीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार होते. याच दौऱ्यात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अर्थखात्यावर चर्चा झाली. हे खाते आमच्या वाट्याचे आहे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.

Sunil Tatkare : अजितदादांच्या निधनानंतर राज्याचे अर्थखाते भाजपाकडे आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या खात्याचा कारभार हाकतात. हे खाते आम्हाला द्यावे, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. परंतु अद्याप या मागणीचा भाजपाकडून सकारात्मक विचार झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीत अर्थमंत्रिपदावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय ही बैठक पार पडली. आता ही बैठक झाल्यानंतर तटकरे यांनी अर्थखात्याच्या मागणीवर भाष्य केलंय.
तटकरे यांनी 22 ऑक्टोबर रोजी माध्यम प्रतिनीधींच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना त्यांनी आम्हाला अर्थखातं मिळालं पाहिजे, अशी मागणी केली आहे. ” आज माझं सूनेत्रा पवार यांच्याशी बोलणं होऊ शकलेलं. आम्हाला अर्थखातं मिळायला हवं. आमची भेट होईल तेव्हा मी अर्थखात्याबाबत भाजपाशी काय चर्चा झाली, हे नक्की विचारेन,” अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, 19 ऑक्टोबर रोजी सुनेत्रा पवार या दिल्लीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार होते. याच दौऱ्यात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अर्थखात्यावर चर्चा झाली. हे खाते आमच्या वाट्याचे आहे. त्यामुळे ते आम्हाला आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. या चर्चेमध्ये सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नव्हते. हे दोन्ही नेते राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. परंतु सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना हे दोन्ही नेते या बैठकीत नसल्याने ही बैठक चर्चेचा विषय ठरली होती. असे असताना आता तटकरे यांनी अर्थखात्यावर काय चर्चा झाली, हे मी सुनेत्रा पवार यांना विचारणार आहे, असे सांगितलेय. त्यामुळे आता भविष्यात याच अर्थखात्यावर काही निर्णय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
