AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर अकलेचे दिवाळे निघाल्याचं लक्षण, ज्योती वाघमारेंचा जोरदार पलटवार, एकनाथ शिंदेंना अटक करा म्हणणाऱ्या सपकाळांना टोला

मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची ईडी चौकशी करा! ऑडिओमध्ये नाव असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करा अशी मागणी सपकाळ यांनी केली होती, त्यानंतर आता ज्योती वाघमारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

हे तर अकलेचे दिवाळे निघाल्याचं लक्षण, ज्योती वाघमारेंचा जोरदार पलटवार, एकनाथ शिंदेंना अटक करा म्हणणाऱ्या सपकाळांना टोला
ज्योती वाघमारे यांचा पलटवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 1:54 AM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. या कथीत ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच हे पैसे  श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत देण्यात आले, असंही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आता या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय  वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ही ऑडिओ क्लिप समोर येताच आता विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या ऑडिओ क्लिपवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत थेट एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

‘मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची ईडी चौकशी करा! ऑडिओमध्ये नाव असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करा! ५०० कोटी रुपये कुठून आले, कोणी आणले, कोणाला दिले, याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा!’ अशी थेट मागणीच हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या या टीकेनंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या वाघमारे?

अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे अकलेचे स्पष्ट दिवाळे निघाल्याचे थेट लक्षण आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी ऐकूण त्यांच्या बैद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ऑडिओ क्लिपच्या आधारावर अटक करा म्हणणे हा कसला बालिशपणा, मनोज जरांगे यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली आहे, त्यामध्ये तिसरीच अज्ञात व्यक्ती श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल अफवा पसरवत आहे. कोणताही पुरावा न देता फक्त एका कथिक ऑडिओ क्लिपच्या आधारे थेट अटकेची मागणी करणे, सपकाळ यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा हल्लाबोल वाघमारे यांनी केला आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ