AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, यावेळी खात्यात थेट 3000 रुपये? अकाऊंट होणार फुल्ल!

Ladki Bahin Yojana Update : राज्यातील पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. या हप्त्याबाबत सूत्रांकडून सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, यावेळी खात्यात थेट 3000 रुपये? अकाऊंट होणार फुल्ल!
Ladki Bahin 1500Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 11, 2026 | 10:03 PM
Share

राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी सर्वात मोठी बातमी आहे. राज्यातील पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. या हप्त्याबाबत सूत्रांकडून सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींना आता दोन्ही महिन्याचे हप्ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहि‍णींना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लाडक्या बहि‍णींना आगामी हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहि‍णींना मिळालेले नाहीत. आता त्यांना लवकरच दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात लाडक्या बहि‍णींना 3000 रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या दोन्ही हप्त्यांची तारीखही लवकरच सरकारकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

66 लाख लाडक्या बहिणी अपात्र

राज्यातील लाडक्या बहि‍णींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र महिलाही घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने अशा महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली होती. अंतिम पडताळणी नंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता या महिलांना आगामी हप्ता मिळणार नाही.

सरकारवरील भार कमी होणार

66 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर आता राज्यात फक्त 1 कोटी 77 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता या महिलांनाच 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आता 66 कोटी महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अंतिम पडताळणीपूर्वी राज्य सरकारला या योजनेसाठी 3 हजार 600 कोटी रुपये खर्च येत होता. मात्र आता तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्यामुळे महिन्याला आता या योजनेवर 2 हजार 655 कोटी खर्च होणार आहेत. या पडताळणीनंतर सरकारचे वर्षाला 1 हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?