AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin : या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का!

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. लाखो लाडक्या बहि‍णींना आता 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Ladki Bahin : या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात  मोठा धक्का!
Ladki Badhin YojanaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 11, 2026 | 5:51 PM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अशातच आता लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. लाखो लाडक्या बहि‍णींना आता 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली. यात अपात्र ठरलेला महिलांना आता निधी मिळणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

66 लाख लाडक्या बहिणी अपात्र

राज्यातील लाडक्या बहि‍णींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र महिलाही घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने अशा महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली होती. अंतिम पडताळणी नंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता या महिलांना आगामी हप्ता मिळणार नाही.

66 लाख महिलांना योजनेतून वगळले जाणार

लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतरचे आकडे आता समोर आले आहेत. 66 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर आता राज्यात फक्त 1 कोटी 77 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता या महिलांनाच 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आता 66 कोटी महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र अपात्र असताना लाभ घेतलेल्या या महिलांवर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात या महिलांना दिलासा मिळणार आहे.

पडताळणीनंतर राज्य सरकारला फायदा

अंतिम पडताळणीपूर्वी राज्य सरकारला या योजनेसाठी 3 हजार 600 कोटी रुपये खर्च येत होता. मात्र आता तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्यामुळे महिन्याला आता या योजनेवर 2 हजार 655 कोटी खर्च होणार आहेत. या पडताळणीनंतर सरकारचे वर्षाला 1 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. याचाच अर्थ या पडताळणीनंतर आता सरकारला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मात्र यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?