AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्याचा मला फोन आला, म्हणाला, वर्षा तू मला… लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात काय होती खंत? अभिनेत्रीचा मोठा दावा काय?

लक्ष्मीकांत बेर्डे यांना विनोदी भूमिकांसाठी ओळखले जात असले तरी, 'एक होता विदूषक'मधील गंभीर भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी एका मुलाखतीत ही खंत उघड केली. लक्ष्याला त्याच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू जगासमोर आणायचा होता, असं त्या म्हणाल्या.

लक्ष्याचा मला फोन आला, म्हणाला, वर्षा तू मला... लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात काय होती खंत? अभिनेत्रीचा मोठा दावा काय?
laxmikant berdeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 11:45 PM
Share

लक्ष्मीकांत बेर्डे आणि विनोदी भूमिका हे समीकरण ठरलेलं होतं. विनोदाचा बादशाह म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंना ओळखलं जायचं. त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी अत्यंत प्रसिद्ध होती. या जोडीने 50 च्यावर हिट सिनेमे दिले आहेत. पण लक्ष्या केवळ विनोदी अभिनेताच नव्हता तर तो एक सशक्त अभिनेता होता. गंभीर भूमिकाही तो उत्तम प्रकारे वठवायचा. ‘एक होता विदूषक’ या सिनेमातून त्याने ते सिद्धही केलं होतं. पण इंडस्ट्रिने त्याला एकाच साच्यात बांधलं. निदान ‘एक होता विदूषक’साठी तरी आपल्याला पुरस्कार मिळेल ही त्याला खंत होती. आयुष्यभर त्याच्या मनात ही सल राहिली होती, खुद्द अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी लक्ष्याच्या मनातील ही खंत बोलून दाखवली होती.

वर्षा उसगांवकर यांनी एका डीजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ‘एक होता विदूषक’ या सिनेमाचा किस्सा सांगतानाच लक्ष्याच्या मनातील घालमेलही बोलून दाखवली. लक्ष्या टॅलेंटेड होता. त्याच्यासोबत मी ‘एक होता विदूषक’ हा सिनेमा केला होता. त्याच्या आधी लक्ष्याची इमेज कॉमेडी, कॉमेडी अशी होती. पण लक्ष्याला एक खंत होतीच. माझा एक वेगळा पैलू लोकांना दिसला पाहिजे, असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

सिनेमा अप्रतिम होता, पण…

डॉ. जब्बार पटेल यांनी ‘एक होता विदूषक’ त्याला ऑफर केला होता. पुलं देशपांडेंनी या सिनेमाचे संवाद लिहिले होते. एका सिद्धहस्त लेखकाने संवाद लिहिले होते. एनएफडीसीने हा सिनेमा प्रोड्यूस केला होता. अतिशय सुंदर असा हा सिनेमा होता. पण तो एवढा चालला नाही, असं वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं.

पैशाचा विचार करू नकोस…

या सिनेमाच्या वेळी लक्ष्याचा मला फोन आला. म्हणाला, वर्षा तुला हा सिनेमा करायचा आहे. तुला नेहमी हिरोईन ओरिएंटेड रोल हवे असतात. हा सिनेमा हिरोईन ओरिएंटेड नाहीये. हा हिरो ओरिएंटेड सिनेमा आहे.या सिनेमात विदूषकाचा रोल महत्त्वाचा आहे. तो रोल मी करतोय. पण त्यात तू मला हवी आहेस. तिथे पैशाचा विचार करू नकोस. पैसे कमी मिळतील. एनएफडीसी तुला जास्त पैसे देणार नाही. पण तो सिनेमा माझ्यासाठी कर. असं त्याने मला निक्षून सांगितलं, असा किस्सा त्यांनी सांगितला.

पुरस्कार मिळायला हवा होता

मग डॉक्टर जब्बार पटेल माझ्याकडे आले. त्यांनी मला कथा ऐकवली. मला तो सिनेमा खरंच आवडलं. मग पैशाची बोलणी वगैरे झाली. त्यांनी जे काही आहे ते मला ऑफर केलं. पण खरंच मी पैशांचा विचार केला नाही. लक्ष्याच्या एका शब्दावर मी सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले आणि शिवाय मला तो रोलही आवडला होता. या सिनेमातून लक्ष्याचा एक वेगळा पैलू यातून दिसेल असं मला वाटलं होतं. लक्ष्या या सिनेमात खूप इंटरेस्ट घेत होता. प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम तिकडे तो हजर असायचा. आपले सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. त्यामुळे मला खूप टचिंग वाटलं. त्याने या सिनेमात ज्या पद्धतीने काम केलंय ना, त्यात वेगळा लक्ष्या मला दिसला. मलाच नाही प्रेक्षकांनाही दिसायला हवा होता. मला असं वाटतं की हा त्याचा अॅवार्ड विनिंग परफॉर्मन्स होता. त्या वर्षीचा पुरस्कार त्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला खंत वाटली. या सिनेमासाठी मला पुरस्कार मिळायला हवा होता, असं त्याला वाटत होतं. मलाही तेच वाटतं, तो पुरस्कार त्याला मिळायला हवा होता. तो मिळाला असता तर त्याला एक वेगळा पैलू मिळाला असता, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?