IND vs NZ : शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी टीम इंडियात मोठे बदल, 5 तगडे खेळाडू थेट बाहेर, नेमकं कारण काय?
Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी टीम इंडियात अचानक मोठे बदल करण्यात आले. शुभमन गिलसह 5 खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, तर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. या निर्णयामागे नेमके कोणते कारण आहे?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. शुभमन गिलसह 5 खेळाडू बाहेर असून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सगळ्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दल जाणून घेऊयात.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने बाकी असतानाच टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारताला मालिका जिंकण्यासाठी आता चौथ्या आणि पाचव्या सामन्यातील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. त्याआधीच संघातील 5 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, 4 खेळाडूंना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, कर्णधारपदाची जबाबदारीही आता दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात आली आहे.
शुभमन गिलसह 5 खेळाडू बाहेर
शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी कर्णधार शुभमन गिल संघाचा भाग नसेल. त्याच्यासोबत यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज यांनाही बाहेर ठेवण्यात आले आहे. मोहम्मद सिराजबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी तोही शेवटच्या दोन सामन्यांत खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याला आगामी 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत उपकर्णधार श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्यावर शेवटच्या दोन सामन्यांत संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
4 खेळाडूंची संघात एंट्री
शेवटच्या दोन सामन्यांसाठी तिलक वर्मा, कुमार कुशाग्र आणि यश ठाकूर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय आकिब नबी यालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, या बदलांमागे आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची तयारी हे प्रमुख कारण असल्याचे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितले आहे. कसोटी संघातील खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. आता नव्या संघासह भारताला वन-डे मालिका जिंकण्यात यश येणार की शेवटच्या दोन सामन्यांतील बदल संघाचे गणित बिघडवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
