AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरच्या मोबाइलमध्ये सापडले अनेक महिलांचे न्यूड व्हिडीओ, दोन अभिनेत्रींना अटक होताच…

केरळमध्ये एका डॉक्टरवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोप आहे. त्याच्या मोबाइलमध्ये अनेक महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडले आहेत. या प्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक झाली असून डॉक्टर जॉनसन वर्गीज फरार आहे. मोबाइलमधील पुराव्यामुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता असून या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

डॉक्टरच्या मोबाइलमध्ये सापडले अनेक महिलांचे न्यूड व्हिडीओ, दोन अभिनेत्रींना अटक होताच...
Kerala caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 10:56 PM
Share

केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका डॉक्टरवर महिलांचं लैंगिक शोषण करण्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर जॉनसन वर्गीज याच्याकडे दोन मोबाइल फोन सापडले आहेत. पोलिसांनी या फोनचा तपास केला असता त्यात महिलांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. या डॉक्टरने एकापेक्षा अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार झाला आहे. मात्र, त्याच्या मोबाइलमध्ये महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

या डॉक्टरच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या डीजिटल पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या फोटोत आणि व्हिडीओत दिसणाऱ्या महिलांनी तक्रार केली तर त्याच्या आधारे या डॉक्टरवर लैंगिक शोषणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल होऊ शकतात, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

व्हिडीओ रेकॉर्डचा आरोप

इंफोपार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तक्रार करणारी महिला मल्याळम अभिनेत्री अतुल्या चंद्रनची नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे. या डॉक्टरने लैंगिक शोषण केलं आणि ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, महिलेच्या आरोपानुसार, अभिनेत्री अतुल्या चंद्रन आणि बिबीन पेरुमपल्ली यांनी डॉक्टरला एका अपार्टमेंटमध्ये बोलावलं होतं. त्याच्या मोबाइलमधून ते व्हिडीओ डिलीट करण्यासाठीच त्याला बोलावलं होतं.

अभिनेत्रींना अटक

यापूर्वी डॉक्टर जॉनसन वर्गीज याने पोलिसांकडे एक तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी अभिनेत्री अतुल्या चंद्रन, अभिनेत्री बिबिन पेरुमपल्ली आणि त्यांचा एक मित्र विष्णू यांना अटक केली होती. 2 नोव्हेंबर रोजी मला या दोन्ही अभिनेत्रींनी कोच्चीच्या वायटिला येथील एसेन स्प्रिंगडेल अपार्टमेंट्समधील एका फ्लॅटमध्ये बोलावलं होतं. आरोपींपैकी एकीच्या मावशीची तब्येत ठिक नसल्याचं कारण सांगून मला बोलावण्यात आलं होतं, असं जॉनसनने तक्रारीत म्हटलं होतं.

मी फ्लॅटमध्ये गेलो, तेव्हा दोन्ही अभिनेत्र्यांसोबत 12 लोक उपस्थित होते. तिथे मला मारहाण करण्यात आली. माझे दोन मोबाइल फोन, स्मार्टवॉच आणि इयरफोन हिसकावून घेण्यात आले. या सर्व साहित्याची एकूण किंमत 3.23 लाख रुपये आहे, असा दावा या डॉक्टरने केला आहे. तिथे असलेल्या लोकांनी एका महिलेला गुंगी आणणारं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा माझ्यावर आरोप केला आणि मला मारहाण केली, असंही त्याने तक्रारीत म्हटलं होतं. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

जामीन फेटाळला

या प्रकरणी एर्नाकुलम येथील न्यायालयात तिन्ही आरोपींना आणण्यात आलं होतं. कोर्टाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अजून प्राथमिक तपास सुरू आहे. त्यामुळे आरोपींना ताब्यात ठेवून त्यांची कसून चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलाने केला होता. आरोपींना जामीन मिळाला तर केसवर परिणाम होऊ शकतो, असा दावाही करण्यात आला होता. त्यामुळे कोर्टानेही हा युक्तिवाद ग्राह्य धरून तिघांना जामीन देण्यास नकार दिला.

डॉक्टरचा शोध सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर जॉनसन वर्गीज याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. जर या फोटो आणि व्हिडीओतील महिलांनी तक्रार केली तर त्या प्रकरणाचाही तपास केला जाईल.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?