इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट… जळगावात भयंकर घडलं
जळगावमध्ये एक वेगळाच प्रकार घडला. स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी तरुणीनं सीमाच ओलांडली. खरंच... प्रेमासाठी बांगलादेशी तरुणी थेट सीमा ओलांडून भारतात आली. या आधीही सिमा हैदर प्रकरण घडलं होतं. मात्र हे प्रकरण अजबच आहे.
जळगावमध्ये एक वेगळाच प्रकार घडला. स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी तरुणीनं सीमाच ओलांडली. खरंच… प्रेमासाठी बांगलादेशी तरुणी थेट सीमा ओलांडून भारतात आली. या आधीही सिमा हैदर प्रकरण घडलं होतं. मात्र हे प्रकरण अजबच आहे. बांगलादेशातील 20 वर्षीय कोनिका राणी शामलचंद्र राय हिची सोशल मीडियावरून जळगावमधील सुवर्ण कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्याशी ओळख झाली होती. काही महिन्यांतच या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी कोनिका राणीने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला आणि थेट जळगाव गाठले.
जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरात ती राहत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तिच्याकडे वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे उघड झाले. चौकशीत ती चिन्मय वालासोबत राहत असल्याचे समोर आले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी कोनिका राणी आणि चिन्मय वाला या दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर

